बंदीजनांनी साधला आप्तांसोबत ‘व्हिडीओ कॉलिंग’ने संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 10:25am

येथील खुले कारागृहातील बंद्यांनी शुक्रवारी आपल्या आप्तेष्टासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये बंद्यांना रक्ताच्याच नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे.

गणेश वासनिक । आॅनलाईन लोकमत अमरावती : येथील खुले कारागृहातील बंद्यांनी शुक्रवारी आपल्या आप्तेष्टासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये बंद्यांना रक्ताच्याच नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे. अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा यांच्या संकल्पनेतून राज्यात खुल्या कारागृहातील पुरुष-महिला बंद्यांसाठी नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाली आहे. या सुविधेला अमरावती खुले कारागृहातून शुभारंभ झाला तेव्हा श्रीकृष्ण पाचगडे व राजाभाऊ सवणे या दोन बंद्यांनी मुलांसोबत व्हिडीओ कॉलिंगने संवाद साधून गावाकडील ख्यालीखुशाली जाणून घेतली. आई, नातवंड, भाऊ कसे आहेत, हे विचारताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कारागृहातील बंदींना नातेवाइकांना भेटताना कठीण नियमावली पार करावी लागते. अशातच नातेवाईकदेखील हलाखीची परिस्थिती, लांबचा प्रवास यामुळे कारागृहापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर खुले कारागृहातील बंदीजनांना व्हिडीओ कॉलिंग ही सुविधेचा प्रारंभ केला. या अभिनव उपक्रमाबाबत कैद्यांनी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांचे मनस्वी आभार मानले. शुभारंभाप्रसंगी मध्यवर्ती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, तुरूंगाधिकारी मोहन चव्हाण, वरिष्ठ तुरुंगाधकारी ए.आर. जाधव, पी.एस. भुसारे, बी.एस. सदांशिव, आर.एन. ठाकरे आदी उपस्थित होते. खुले कारागृहातील कैद्यांसोबत रक्ताची नाती असलेल्यांनाच व्हिडीओ कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येईल. प्रशासनाकडे नियमानुसार त्याची नोंद असेल. हा सर्व प्रकार आॅनलाईन राहील. वरिष्ठांना क्षणात माहिती मिळेल. - रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.

संबंधित

World Emoji Day : 'या' इमोजींचा भारतात होतो सर्वाधिक वापर!
वर्ल्ड इमोजी डे... मानवी भावनांना कैद करणाऱ्या 'या 5 स्माईली'
रशियात एकच छत्री आहे का?; राष्ट्रपती पुतीनवर जोक्सचा पाऊस
Fifa World Cup 2018 : फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल
पुष्पक विमानातून नवरी-नवरदेवाची दणक्यात एन्ट्री; व्हिडीओ व्हायरल

अमरावती कडून आणखी

आमदाराच्या घरासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न आंदोलन
आता बांबू गार्डन यू-ट्यूबवर उपलब्ध
दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल
तेरा कोटी वृक्ष लागवडीचा बोजवारा
मुसळधार पावसाची शक्यता

आणखी वाचा