खासदार राणांच्या निवासस्थानी नव्या पालकमंत्र्यांचे औक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:31 PM2019-06-24T22:31:33+5:302019-06-24T22:31:47+5:30

अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त्यानंतर लगेच राणा दाम्पत्याचे घर गाठले. स्वत:च्या घरी जाण्यापूर्वी नामदार बोंडे यांनी सपत्निक राणा दाम्पत्याचे घर गाठण्याच्या कृतीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.

The new Guardian Minister at the residence of Rana Rana | खासदार राणांच्या निवासस्थानी नव्या पालकमंत्र्यांचे औक्षण

खासदार राणांच्या निवासस्थानी नव्या पालकमंत्र्यांचे औक्षण

Next
ठळक मुद्देराजकीय गुपित काय? : बोंडेंनी स्वत:च्या घरापूर्वी गाठले गंगासावित्री सदन

अमरावती : अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त्यानंतर लगेच राणा दाम्पत्याचे घर गाठले. स्वत:च्या घरी जाण्यापूर्वी नामदार बोंडे यांनी सपत्निक राणा दाम्पत्याचे घर गाठण्याच्या कृतीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.
राजकीय सारीपाटावरील हा घटनाक्रम हल्ली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेमुळे केवळ भाजप-सेनाच नव्हे तर महाआघाडीच्या नेत्यांचेही कान टवकारले आहेत. तसा दिसणारा हा स्वागताचा अगदी औपचारिक कार्यक्रम असला तरी याला मागील वर्षभरातील भाजपचे माजी पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांच्या संघर्षाची किनार आहे. त्यामुळेच बोंडे यांची ही भेट अन् खा. नवनीत यांनी त्यांचे केलेले औक्षण जिल्ह्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवू शकेल. लोकसभेच्या धुमश्चक्रीत राणा दाम्पत्याविरुद्ध भाजप-सेनेने आगपाखड केली. नवनीत राणा निवडून येऊ नयेत यासाठी नुकतेच पायउतार झालेले पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. मतदारांनी नवनीत राणा यांना खासदारपद बहाल केले. लागोलाग पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुख्यमंत्र्यांनी प्रवीण पोटे यांचे मंत्रिपद काढून घेतले. पोटेंच्याच जिल्ह्यातील बोंडेंना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद बहाल केले. या नव्या पालकमंत्र्यांनी पहिले काम केले ते नवनिर्वाचित खा. नवनीत आणि बडनेºयाचे आ. रवि राणा यांचे भाजपच्या लेखी असलेले मोल कृतीतून जाहीर करण्याचे!
अनेकांना पोटशूळ
शेतकऱ्यांचा कैवार असलेला कृषिमंत्री अन् सर्वांना न्याय देणारा पालकमंत्री असल्याचे जाहीर करीत राणा दाम्पत्याच्या युवा स्वाभिमानने अनिल बोंडेंच्या शपथविधीनंतर शहरातील चौकाचौकांत आतषबाजी केली. ना.बोंडे यांनी निवासस्थानी भेट दिली त्यावेळीही राणा दाम्पत्याने दमदार आतषबाजी केली. ना. बोंडे यांनीही सपत्नीक स्वागताचा स्विकार करीत आमदार रवि राणा यांच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या युवा स्वाभिमान पदाधिकाºयांनी ना. बोंडेंचा जयघोष केला. दोघांमधील ही गट्टी भाजपातील काहींना पोटशूळ उठविणारी ठरली असली तरी त्यांच्याशीच कदमताल करण्याशिवाय अशा मंडळींना दुसरा पर्याय तरी कुठला?

Web Title: The new Guardian Minister at the residence of Rana Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.