नायगाव ग्रामपंचायत पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:25 AM2019-02-23T01:25:21+5:302019-02-23T01:25:50+5:30

स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे.

Naigaon Gram Panchayat Paperless | नायगाव ग्रामपंचायत पेपरलेस

नायगाव ग्रामपंचायत पेपरलेस

googlenewsNext
ठळक मुद्देपुरस्कार : कर, दाखले, प्रमाणपत्र आॅनलाइन मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : स्थानिक पंंचायत समिती अंतर्गत नायगाव गटग्रामपंचायत ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या प्रकल्पांतर्ग$त नुकतीच पेपरलेस झालेली आहे.
ग्रामपंचायतच्या १ ते ३३ नमुन्याचे कामकाज आता संगणकीकृत झाले आहे. या लोकभिमुख उपक्रमासाठी दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांच्या हस्ते सरपंच शीतल कोकाटे, उपसरपंच अरुण मोकलकार, ग्रामसेविका सुषमा धर्माळे व केंद्रचालक निकिता हरणे यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य उमा हिवराळे, प्रिया कोकाटे, कांता पुरभे, ललिता तायडे, नागसेन पळसपगार, अक्षय टेकाडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र कोकाटे व ग्रा.पं. महिमापूर, उपराई, नरशिंगपूर येथील संगणक परिचालक तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Web Title: Naigaon Gram Panchayat Paperless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.