प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटला नॅकचे मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 05:47 PM2018-06-27T17:47:41+5:302018-06-27T17:48:08+5:30

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीद्वारा संचालित प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, बडनेरा या महाविद्यालयाला नॅकतर्फे ५ वर्षांसाठी 'अ' श्रेणी देण्यात आली आहे.

NAC's rating for Ram Meghe College of Engineering and Management | प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटला नॅकचे मानांकन

प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटला नॅकचे मानांकन

Next

अमरावती - विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीद्वारा संचालित प्रा. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, बडनेरा या महाविद्यालयाला नॅकतर्फे ५ वर्षांसाठी 'अ' श्रेणी देण्यात आली आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, उपाध्यक्ष हेमंत देशमुख, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, अ‍ॅड. उदय देशमुख, गजानन काळे, रागिणी देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एस. अली यांच्या मार्गदर्शनात हे यश मिळाले आहे.
नॅक ही राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे परीक्षण करून त्यांच्या सक्षमतेनुसार त्यांना मानांकन देते. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षक नॅकतर्फे पाठविण्यात येतात. दोन दिवसीय परीक्षणात त्रिसदस्यीय समिती नॅकतर्फे परीक्षणासाठी पाठविली होती. समितीचे अध्यक्ष डॉ.गुहा, डॉ.कामत, डॉ. कुशवाह हे परीक्षणासाठी आले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयाचे परीक्षण केले व सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाचे सादरीकरण केले. यात विद्यार्थी आणि पालकांचे मत जाणून घेण्यात आले.
या त्रीसदस्यीय समितीने महाविद्यलयाकडून चालविण्यात येणाºया विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या आईडीसीचे कौतुक केले. 
महाविद्यालयाकडून एकूण २५ पेटेंट तसेच भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या १.५ कोटी रुपयांचे कौतुक केले. संशोधनात व चांगले विद्यार्थी घडविण्यात महाविद्यालयाचा मोलाचा वाटा असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नॅकच्या परीक्षणसाठी 'आयक्यूएसी' समन्वयक डॉ.स्वप्निल मोहोड तसेच समन्वयक म्हणून डॉ.दिनेश हरकुट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नॅक 'अ' श्रेणी प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाचा दर्जा राष्ट्रीय पातळीवर उंचावला आहे.

Web Title: NAC's rating for Ram Meghe College of Engineering and Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.