प्रसूतीदरम्यान माय-लेकीचा मृत्यू , अमरावतीचे डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोव-यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 07:39 PM2018-01-05T19:39:14+5:302018-01-05T19:39:56+5:30

तालुक्यातील उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात गुरुवारी उशिरा रात्री प्रसूतीदरम्यान महिला व तिच्या नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने शहरातील वातावरण ढवळून निघाले.

Myelike's death during delivery, Dr. Amravati Sushila Nayar Hospital again raises controversy | प्रसूतीदरम्यान माय-लेकीचा मृत्यू , अमरावतीचे डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोव-यात

प्रसूतीदरम्यान माय-लेकीचा मृत्यू , अमरावतीचे डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोव-यात

Next

धारणी : तालुक्यातील उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात गुरुवारी उशिरा रात्री प्रसूतीदरम्यान महिला व तिच्या नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने शहरातील वातावरण ढवळून निघाले. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा आरोग्य मंडलद्वारा संचालित उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटलमध्ये धारणी येथील अमृता रोमित गुप्ता (२२) या गर्भवतीला काल गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर सर्व रिपोर्ट सामान्य असून, प्रसुती सामान्य होईल, असे आश्वासन उपचार करणारे डॉ. केतकी छाबडा व डॉ. प्रवीण यांनी परिजनांना दिले. 

अमृताला सायंकाळी ६ च्या सुमारास प्रसवकळा सुरू झाल्या. यादरम्यान गर्भातील अर्भकाबाबत शंका येताच प्रसूतीचे प्रयत्न आरंभिले गेले. काही वेळाने नवजात मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर अमृताला रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिचीही स्थिती गंभीर झाल्याचे परिजनांना कळविण्यात आले. उपचाराचे सारे प्रयत्न विफल होऊन मध्यरात्री अमृताने शेवटचा श्वास घेतला.


अमृताचे सर्व अवयव सामान्यपणे काम करीत असताना नवजात व त्यापाठोपाठ प्रसूताचा मृत्यू होण्याची घटना पहिल्यांदाच पहावयास मिळाला. या संस्थेत यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याने या दवाखान्याची चौकशी करणे आवश्यक आहे.
- शैलेश जिराफे, होमिओपॅथ, धारणी.


अमृताचे प्रकरण माझ्यासाठी आव्हान होते. मात्र, त्यात अपयश आले. मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यासाठी पोस्टमार्टम करण्याचा सल्ला परिजनांना दिला आहे.
- डॉ. केतकी छाबडा, वरिष्ठ शल्यचिकित्सक 
डॉ. सुशिला नायर हॉस्पीटल, उतावली.


यापूर्वीही अनेक गरीब आदिवासी महिलांचे प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची प्रकरणे रुग्णालयात घडली आहेत. मार्च महिन्यात लवादा येथील एका महिलेचा प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला होता. सेवाग्राम येथून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची चमू पाठविण्यात येते. या डॉक्टरांना वैद्यकीय अनुभव नसताना ते आपल्या परीने रुग्णांवर बेजबाबदार उपचार करतात. या दवाखान्यात परिजनांना विश्वासात न घेताच व उपचाराची माहिती न देता मोठी रक्कम उकळली जात असल्याची अनेकांची तक्रार आहे. 

Web Title: Myelike's death during delivery, Dr. Amravati Sushila Nayar Hospital again raises controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.