लोकसभा निवडणुकीत जालन्यात दानवेंना चितपट करणारच; बच्चू कडूंनी दंड थोपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 11:46 AM2018-09-22T11:46:50+5:302018-09-22T11:52:56+5:30

जालन्यातून निवडणूक लढवण्यासाठी बच्चू कडूंची जोरदार तयारी

mla bacchu kadu to contest loksabha election from jalna against raosaheb danve | लोकसभा निवडणुकीत जालन्यात दानवेंना चितपट करणारच; बच्चू कडूंनी दंड थोपटले

लोकसभा निवडणुकीत जालन्यात दानवेंना चितपट करणारच; बच्चू कडूंनी दंड थोपटले

googlenewsNext

अमरावती: अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना चितपट करुनच जालन्यातून परत येऊ, असा निर्धार बच्च कडू यांनी केला आहे. बच्चू कडूंच्या विधानावर अद्याप दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. 

रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना साले म्हटलं होतं. तूर खरेदीबद्दल बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. 'इतकी तूर खरेदी केली, तरी रडतात साले,' असं दानवे म्हणाले होते. त्यावेळी बच्चू कडूंनी दानवेंच्या विधानाचा निषेध केला होता. त्यानंतर आता कडू यांनी दानवेंविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या दानवेंविरोधात आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेची निवडणूक लढवू, असं कडू आधीच म्हणाले होते. 

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं बच्चू कडूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दानवे यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पण त्यांनी केला आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याची टीका त्यांनी केली. दानवेंच्या मतदारसंघात रेतीची तस्करी चालते, अवैध दारु विक्री चालते, अशा शब्दांमध्ये त्यांनी दानवेंवर तोंडसुख घेतलं.  
 

Web Title: mla bacchu kadu to contest loksabha election from jalna against raosaheb danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.