परस्पर कापूस विक्रीने बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:50 PM2018-03-24T23:50:57+5:302018-03-24T23:50:57+5:30

यंदा बोंडअळीने कापूस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. खासगी खरेदीत हमीपेक्षा अधिक भाव असल्याने पणनची केंद्र ओस पडलीत. खासगीकडे शेतकऱ्यांचा कल व परस्परच व्यापाऱ्यांना कापसाची विक्री होत आहे. यामुळे स्थानिक बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडत असल्याचे वास्तव आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तीनपट सेस कमी वसूल झाल्याचे चित्र आहे.

Market Committee 's cess of millions of rupees by selling cotton | परस्पर कापूस विक्रीने बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडाला

परस्पर कापूस विक्रीने बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडाला

Next
ठळक मुद्देमागील वर्षी एक कोटींची वसुली : व्यापारी मालामाल

संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यंदा बोंडअळीने कापूस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. खासगी खरेदीत हमीपेक्षा अधिक भाव असल्याने पणनची केंद्र ओस पडलीत. खासगीकडे शेतकऱ्यांचा कल व परस्परच व्यापाऱ्यांना कापसाची विक्री होत आहे. यामुळे स्थानिक बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडत असल्याचे वास्तव आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तीनपट सेस कमी वसूल झाल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी अमरावती बाजार समितीला कापूस विक्रीतून एक कोटी ३५ लाख रुपये सेस मिळाल्याची माहिती आहे. त्या तुलनेत यंदा जानेवारीअखेर २५ लाखांचाच सेस बाजार समितीला प्राप्त झाल्याची माहिती प्रभारी सचिव बी.एल. डोईफोडे यांनी दिली. बाजार समितीतून कुठल्याही शेतमालाची काट्यावर मोजमाप व खरेदी झाली तर त्याचा १.५ टक्के सेस वसूल केला जातो. यातून १ टक्का सेस बाजार समितीला मिळतो. ०.५ टक्के सेस शासनाला जातो. परंतु, अमरावतीमध्ये १० जिनिंग प्रेसिंग नोंदणीकृत आहेत. अंदाजे ४५० रेचेधारक अनधिकृत व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. मात्र, शासनाने कपाशीला सध्या प्रतिक्विंटल ४ हजार ३०० रूपये हमी भाव आहे. व पणनच्या केंद्रांवर याच भावाने किंबहुना स्टेपलनुसार त्यापेक्षा कमी भावाने खरेदी केली जात असल्याने शेतकरी व्यापाºयांकडे वळत आहे. खासगीत सध्या ४३०० ते ४७०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कापसाची खरेदी होत आहे.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील खासगी जिनिंगमधील व्यवहारांवर 'वॉच' नसल्याने नेमका किती कापूस खरेदी केला याची अधिकृत नोंद बाजार समिती मिळत नाही. खासगी व्यापारी शेतकºयांना अधिकृत पावतीसुद्धा देत नाहीत. मात्र कापसाचे व्यवहार नियमित होत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नाचे स्त्रोत असलेला लाखोंचा सेस यामुळे बुडत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

जिनिंग काट्यावर ३० कर्मचाºयांची नियुक्ती
येथील जिनिंगच्या काट्यावर सेस फंडाच्या वसुलीसाठी नियमन लागू असते. येथे रोज हजारो क्विंटल कापसावर प्रक्रिया होऊन हजारो गाठी तयार होतात. या ठिकाणी प्रत्येक जिनिंग प्रेसिंगच्या काट्यावर कर्मचारी नियुक्त आहेत. सद्यस्थितीत बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ३० कर्मचारी यावर लक्ष ठेवत असल्याचे सभापती प्रफुल्ल राऊत यांनी सांगितले.

बँक स्टेटमेंट तपासल्यास सत्य येणार बाहेर
या हंगामात अडते, खरेदीदाराने किती क्विंटल कापूस खरेदी केला, याचे बाजार समितीने बँक स्टेटमेंट मागून तपासणी केल्यास नेमका व्यापाºयांनी बाजार समितीचा किती सेस बुडविला, त्याचे सत्य बाहेर येईल. त्यामुळे सचिव व सभापतींनी या संदर्भाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पणन महासंघाकडे शेतकºयांची पाठ
यंदाच्या हंगामात गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादकांचा घात केल्याने सरासरी उत्पन्नात ५० टक्के घट झाली. अशा परिस्थितीत पणन केंद्रांवरील जाचक निकष व त्या तुलनेत खासगी खरेदीत मिळत असलेला अधिक भाव यामुळे शेतकºयांनी पणनच्या केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.

बाजार समितीच्या वजनकाट्यावर व्यापाºयांनी कापूस खरेदी करावे, यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले आहे. जिनिंग प्रेसींगला या संदर्भात विचारणा करण्यात येईल. गेटपासशिवाय माल मोजमाप करू नये.
- प्रफुल्ल राऊत, सभापती, बाजार समिती, अमरावती

Web Title: Market Committee 's cess of millions of rupees by selling cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.