गांजा सापडला सकाळी; तक्रार रात्री का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:16 PM2018-07-22T23:16:42+5:302018-07-22T23:17:06+5:30

येथील मध्यवर्ती कारागृहातील रेशन धान्य भांडारात १८ जुलै रोजी सकाळी गांजाच्या पुड्या सापडल्या असताना त्याबाबतची तक्रार मात्र रात्रीच्या सुमारास करण्यात आली. त्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

Marijuana found in morning; Why is the complaint night? | गांजा सापडला सकाळी; तक्रार रात्री का?

गांजा सापडला सकाळी; तक्रार रात्री का?

Next
ठळक मुद्देप्रकरण संशयाच्या भोवऱ्यात : मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील रेशन धान्य भांडारात १८ जुलै रोजी सकाळी गांजाच्या पुड्या सापडल्या असताना त्याबाबतची तक्रार मात्र रात्रीच्या सुमारास करण्यात आली. त्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
सकाळी गांजा सापडला असताना, दुपारपर्यंत तक्रार करणे अपेक्षित होते; मात्र ती तक्रार रात्री करण्यात आल्याने एकंदर प्रकरणाविषयी संशय निर्माण झाला आहे. कारागृहाच्या आत गांजा सापडल्यामुळे आता सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फ्रेजरपुरा पोलीस कसून चौकशी करीत असून, आतापर्यंत पोलिसांनी सहा कैद्यांचे बयाण नोंदविले आहे.
पोलीस सूत्रानुसार, बुधवार १८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता उपअधीक्षक गायकवाड व कैदी सूरज दर्शनाल धान्य गोडावूनमध्ये गेले होते. त्यावेळी चणा डाळीच्या पोत्यात त्यांना गांजाच्या दोन पुड्या आढळून आल्या. त्यांनी अधीक्षक रमेश कांबळे यांना ही माहिती दिली. त्यांनीही गांजा आढळल्याबाबत चौकशी केली. त्या पोत्यात गांजासह एक सिम, १७ खर्रे व किरकोळ रोखसुद्धा असल्याची माहिती प्रथम समोर आली होती. मात्र, पोलीस तक्रारीत केवळ गांजाच्या पुड्या आढळून आल्याचे नमूद आहे. सकाळी गांजा आढळला असताना पोलिसांकडे रात्री तक्रार नोंदविण्यात आली.
दरम्यान, कारागृह प्रशासनाने कोणती चौकशी केली. त्यांनी तक्रार करण्यात उशीर का केला, हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेवर शासनाकडून विशेष लक्ष पुरविले जाते. दरवर्षीच शासनस्तरावर सर्वेक्षण करून सुरक्षेचा आढावा घेतला जातो. फे्रजरपुरा पोलिसांनीही मध्यंतरी सुरक्षेचा आढावा घेतला. शासन कारागृह सुरक्षेबाबत गंभीर असतानाही तेथे गांजा आढळून आल्याने विविध चर्चांचे पेव फुटले आहे. फे्रजरपुºयाचे पोलीस उपनिरीक्षक लेवटकर यांनी शनिवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत कारागृहात चौकशी केली. धान्य गोडाऊनमध्ये आणखी काही संशयित साहित्य सापडले का, याबाबत कारागृह प्रशासनाला पोलिसांनी पत्र दिले आहे.

कारागृहाच्या इतिहासातील काही घटना
मध्यवर्ती कारागृहात काही वर्षांपूर्वी गांजा आढळला होता. सहा वर्षांपूर्वी पुणे येथील टास्क फोर्सने अचानक कारागृहाची तपासणी केली. त्यावेळी बल्लारशा येथील खूनप्रकरणातील एका कैद्याने जवळ बाळगलेले सिमकार्ड गिळले होते. सप्टेंबर २०१४ रोजी कारागृहात गांजा पुरविणाºया एका पोलिसाला पकडून त्याच्याकडून ६० ग्रॅ्रम गांजा जप्त केला होता. कारागृहातून न्यायालयात आणलेल्या एका कैद्याला कैद्याला गांजा पुरविताना एकास पकडण्यात आले होते. कारागृहातील काही पोलीस किंवा बंदीच्या संगनमताने हे प्रकार घडत असल्याची शक्यता आहे.

पाच कैद्यांकडे सहा वर्षांपासून ड्युटी
आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाºया पाच कैद्यांकडे रेशन धान्य गोडाऊनमध्ये हमाली कामाची जबाबदारी आहे. सफाई राखण्याचे व धान्य साफ करण्याचे काम हे कैदी करतात. वरिष्ठ लिपिक प्रमोद महाजन हे भांडारगृहाचे इन्चार्ज आहेत. धान्य काढून देण्याचे कामसुद्धा महाजन पाहतात. मात्र, त्यांच्याकडे रोखपालाचा चार्ज असल्यामुळे ते बुधवारी सकाळी कॅशियर रूममध्ये होते. त्याचदरम्यान उपअधीक्षक गायकवाड यांना चणा डाळीच्या पोत्यात गांजा आढळून आला होता.

सकाळी आकस्मिक झडतीदरम्यान धान्य भांडार विभागात एका गोणीमध्ये गांजाच्या दोन पुड्या आढळून आल्या. त्याशिवाय कोणतेही साहित्य नव्हते. कार्यालयीन प्रक्रियेनुसार चौकशी, बयाण, जाबजबाब नोंदविल्यानंतर रात्री तक्रार करण्यात आली.
- रमेश कांबळे, कारागृह अधीक्षक

Web Title: Marijuana found in morning; Why is the complaint night?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.