अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:54 PM2017-10-28T15:54:15+5:302017-10-28T16:02:25+5:30

Marathi Department in Amravati University, Hindi Department | अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठीकडे

अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठीकडे

Next
ठळक मुद्देतासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती,विद्यार्थी संभ्रमातमराठीला रिक्तपदांचे ग्रहण


आॅनलाईन लोकमत
गणेश वासनिक/अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठी विभागाच्या सहायक प्रमुखांकडे सोपविला आहे. रिक्त पदांच्या ग्रहणामुळे हा अफलातून निर्णय घेण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एकूण २८ विभाग आहेत. त्यापैकी २४ अनुदानित, तर चार विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. यामध्ये ३३ प्राध्यापक व प्रथम ते चतुर्थ श्रेणी २३४ कर्मचाºयांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. अद्याप प्रस्तावावर शासनस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी रिक्त पदांच्या भरतीबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनादेखील निवेदनाद्वारे अवगत केले. विद्यापीठाला एकूण १३५ प्राध्यापकांची आवश्यकता आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
आठ महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख पदावरून शंकर बुंदिले निवृत्त झाले. त्यांच्यानंतर हिंदी विभागप्रमुखपदाची धुरा कोणाच्या हाती सोपवावी, असा प्रश्न रिक्त पदांमुळे निर्माण झाला होता. विद्यापीठ प्रशासनाचे मराठी विभाग सहायकप्रमुख मोना चिमोटे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. मराठी विभागाकडे हिंदीचा कारभार असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यापीठाला हिंदी भाषेच्या जाणकार व्यक्तीकडे या विभागाची धुरा सोपविता न येणे ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे.
हिंदी विभागात आठ प्राध्यापकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापकांना विद्यापीठात कायम नोकरीची ‘गॅरंटी’ नाही. त्यामुळे हे प्राध्यापकदेखील ‘टाईमपास’च्या भूमिकेत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहेत. दुसरीकडे विविध रिक्त पदांमुळे शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना विद्यापीठ प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गत आठ महिन्यांपासून हिंदी विभागाचा कारभार सांभाळत आहे. मराठी विभागाचे प्राध्यापक असले तरी हिंदीचे ज्ञान उत्तम आहे. हिंदी विभागप्रमुख पदभरतीबाबत प्रशासनाने आवश्यक बाबी पूर्ण केल्या. मात्र, शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे.
- मोना चिमोटे,
प्रभारी, हिंदी विभागप्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

Web Title: Marathi Department in Amravati University, Hindi Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.