Lok Sabha Election 2019; गोपगव्हाणला मतदानाचा टक्का शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:03 AM2019-04-19T01:03:53+5:302019-04-19T01:05:09+5:30

बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गोपगव्हाण येथील ग्रामस्थांनी गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली नाही. त्यामुळे ५३६ मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही, हे विशेष.

Lok Sabha Election 2019; Voting percentage of Gopagavana zero | Lok Sabha Election 2019; गोपगव्हाणला मतदानाचा टक्का शून्य

Lok Sabha Election 2019; गोपगव्हाणला मतदानाचा टक्का शून्य

Next
ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांना हवा वाढीव मोबदला

अमरावती/बडनेरा : बडनेरा विधानसभा मतदारसंघातील गोपगव्हाण येथील ग्रामस्थांनी गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला. निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली नाही. त्यामुळे ५३६ मतदारांपैकी एकानेही मतदान केले नाही, हे विशेष.
गोपगव्हाण हे गाव बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. जिल्हा निवडणूक कार्यालयाने गोपगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र निश्चित केले. त्यानुसार मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेची तयारीसुद्धा केली. तथापि, सकाळी ७ वाजेपासून प्रारंभ झालेल्या दुपारी ३ वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदान केले नव्हते. ‘आधी प्रकल्पगस्तांचा वाढीव मोबदला, नंतर मतदान’ अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले. गोपगव्हाण येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याने बडनेरा पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या नेतृत्वात पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून होते. गोपगव्हाण येथील बहुतांश शेतकऱ्यांची निम्न पेढी प्रकल्पात जमीन गेली आहे. मात्र, अतिशय कमी दराने शासनाने भूसंपादन केले, असा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा, यासाठी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आंदोलन, मोर्चेदेखील काढण्यात आले. मात्र, शासन, प्रशासनाने गोपगव्हाण येथील प्रकल्पग्रस्तांची हाक ऐकली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने लोकसभा निवडणुकीत बहिष्काराचा निर्णय संपूर्ण ग्रामस्थांनी घेतला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होताच ग्रामस्थांनी वाढीव मोबदला नाही, तर मत नाही,असा निर्णय एकमताने घेतला होता.

जिल्हा निवडणूक विभागाने गोपगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र निश्चित केले होते. मात्र, सकाळी ७ वाजेपासून एकाही मतदाराने मतदान केले नाही. निवडणूक बहिष्कार कायम ठेवला होता.
- अतुल पेढेकर
पोलीस पाटील, गोपगव्हाण

Web Title: Lok Sabha Election 2019; Voting percentage of Gopagavana zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.