Lok Sabha Election 2019; ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:27 AM2019-04-20T01:27:57+5:302019-04-20T01:29:15+5:30

लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी पार पडली. त्यानंतर जीपीएस यंत्रणा असलेल्या ३९ ट्रकमधून ईव्हीएम शुक्रवारी दुपारपर्यंत बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामातील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने येथे त्रिस्तरीय तगडा बंदोबस्त आहे.

Lok Sabha Election 2019; 'Seal' in EVM Strong room | Lok Sabha Election 2019; ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ‘सील’

Lok Sabha Election 2019; ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ‘सील’

Next
ठळक मुद्देत्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था : पोलिसांचा सशस्त्र पहारा, सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी पार पडली. त्यानंतर जीपीएस यंत्रणा असलेल्या ३९ ट्रकमधून ईव्हीएम शुक्रवारी दुपारपर्यंत बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामातील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने येथे त्रिस्तरीय तगडा बंदोबस्त आहे. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी जातीने हजर होते.
गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या काळात मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर ६०.३६ टक्के मतदान पार पडले. अत्यंत शांततेत व सुरळीत मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व केंद्रांवरील ईव्हीएम मतदारसंघनिहाय जमा करण्यात आले. त्यानंतर ते लोकसभा मतदारसंघाची स्ट्राँग रूम असलेल्या नेमाणी गोदामात आणण्यास सुरूवात झाली. गुरुवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्राँग रूमवर पोहोचले. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत शहरालगत असलेल्या मतदान केंद्रातील ईव्हीएमही स्ट्राँग रूमवर आणण्यात आले. शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत मेळघाटसह इतर विधानसभा मतदारसंघातील केंद्रांवरील ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पोहोचविण्यात आले. तब्बल ३४ दिवस ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सशस्त्र जवानांच्या निगराणीत राहणार आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी स्ट्राँग रूमवर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे सीआरपीएफ व एसआरपीएफच्या प्रत्येकी एक तुकडीसह ३ पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक व ४० कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेश बंदीही करण्यात आली आहे.

सहा गोदामांची दरवाजे सिमेंट, विटांनी ‘पॅक’
नेमानी गोदामात ज्या सहा गोदामात इव्हीएम ठेवण्यात आल्यात त्याचे दरवाज्याला मोठे भक्कम कुलूप लावण्यात आले व हे सर्व सहाही दरवाजे सिमेंट, विटांनी बुजविण्यात आलेत. हे काँक्रीट आता मतमोजणीच्या दिवशीच तोडण्यात येणार आहे.
यांना घेता येणार सुरक्षेचा आढावा
नेमानी गोडाऊन येथे अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कुणालाच जायची परवानगी नाही. परंतु लोकसभा निवणुकीतील उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांना ईव्हीएम सुरक्षित आहेत काय? याचा आढावा घ्यायचा असेल तर त्यांना ते पाहता येईल. मात्र, यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; 'Seal' in EVM Strong room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.