Lok Sabha Election 2019; प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:29 AM2019-04-10T01:29:25+5:302019-04-10T01:31:48+5:30

गाव स्मार्ट बनल्यास प्रत्येक शहर स्मार्ट बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील परसापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

Lok Sabha Election 2019; The resolution of making every village smart | Lok Sabha Election 2019; प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प

Lok Sabha Election 2019; प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प

Next
ठळक मुद्देनवनीत राणा : परसापूर येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
परसापूर : गाव स्मार्ट बनल्यास प्रत्येक शहर स्मार्ट बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्मार्ट बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील परसापूर येथे प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
प्रचारसभेला मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व केवलराम काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेला पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. मेळघाटच्या सर्वांगिण विकासासाठी नवनीत राणा यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या माजी आमदारद्वयींनी केले. अंजनगाव सुर्जी परिसरात एमआयडीसी, कृषी विज्ञान केंद्र, तर परसापूर भागात संत्रा व केळी प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी सरपंच अरुणा वानखडे, माजी उपसरपंच वीरेंद्र वर्मा, जिल्हा संपर्क प्रमुख जितू दुधाने, वर्षा मनवरे, लता चुटे, शालिनी दुधे, ग्रा.पं. सदस्य आशिष वानखडे, छाया शिवणकर आदी उपस्थित होते.
अंबागेटला जुने वैभव प्राप्त करुन देऊ
अमरावती : जुन्या अमरावतीमध्ये मोडणाऱ्या अंबागेटमधील प्राचिन मंदिरांचे सौंदर्यीकरण व विकासासाठी अधिकाधिक निधी देऊन या भागाला जुने वैभव प्राप्त करून देण्याची ग्वाही महाआघाडीच्या उमेदवार नवनित राणा यांनी दिली. तारखेडा, जुनी टाकसाळ, बुधवारा, इंद्रभुवन थिएटर, आदर्श गणेशोत्सव मंडळ येथे त्यांच्या प्रचार सभा पार पडल्या. नवनीत राणा यांच्या प्रचारसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार सभा घेण्यात येत आहेत.
अंबागेटमधील परिसरात बोलताना नवनीत राणा हळव्या झाल्या. आ. रवि राणा हे सर्वांसाठी मुलासमान असून स्रुषा म्हणून आशीर्वाद दिल्यास या भागाचा चेहरामोहरा पालटविण्याची हमी त्यांनी दिली. आ. राणा यांनी काळा मारोती मंदिराला १० लाख रुपये निधी देण्याचे कबूल केले होते. पाच लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या भागाचा विकास करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी नगसेविका सुनीता भेले, नूतन भुजाडणे, माजी नगरसेविका अर्चना राजगुरे,किरण गुलवाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सुनील शेट्टींचा आज रोड शो
प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांचा तिवसा येथे १० एप्रिलला रात्री ८ वाजता रोड शो करतील. नवनीत राणा व सुनील शेट्टी यांची रात्री ९ वाजता गुरुकुंज मोझरी येथे जाहीर सभा होईल. सुनील शेट्टी यांचा ११ एप्रिल रोजी चिखलदरा येथे मुख्य चौकात सकाळी ७ वाजता, सकाळी ८ वाजता सेमाडोह, सकाळी ९ वाजता हरिसाल व काटपूर येथे सकाळी १० वाजता रोड शो होईल. सकाळी ११ वाजता धारणी व चुर्णी येथे दुपारी १२ वाजता जाहीर सभा होणार आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2019; The resolution of making every village smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.