Lok Sabha Election 2019; The percentage of women power, who will push? | Lok Sabha Election 2019; स्त्री शक्तीचा टक्का, कुणाला देणार धक्का?
Lok Sabha Election 2019; स्त्री शक्तीचा टक्का, कुणाला देणार धक्का?

ठळक मुद्देएकूण मतदारांच्या ४९ टक्के : पाच वर्षांत वाढले सव्वा लाख महिला मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सात लाख ६२ हजार ६०० महिला मतदारांपैकी चार लाख ४६ हजार ४८६ महिलांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावले. हे ५८.५५ टक्के मतदान होते. त्यातुलनेत यंदा आठ लाख ८७ हजार ८० महिला मतदार आहेत. म्हणजेच पाच वर्षांत एक लाख २४ हजार ४८० महिला मतदार वाढले आहे. त्यामुळे हेच वाढीव मतदान यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघात यंदा आठ लाख ८७ हजार ८० महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंख्येच्या ४८.५२ टक्के असणारी महिला मतदारांची संख्या निर्णायक आहे. यामध्ये सात लाख ४० हजार ८७६ महिला मतदार पन्नाशीच्या आतील आहेत. एकूण महिला मतदारांचे ६३ टक्के हे प्रमाण असल्याने यंदा महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढणार आहे. मात्र हे मतदान कोणाच्या पारड्यात जाते व कुणाला धक्का देते, यावरही मतदारसंघातील उमेदवारांचे यशापयश अवलंबून आहे.
सन २०१४ च्या निवडणुकीचा आढावा घेता एकूण पुरूष मतदारांचे ६५.५४ टक्के पुरूष मतदारांनी व महिला मतदारांचे तुलनेत ५८.५५ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा ‘स्वीप’ अभियानाच्या नोडल अधिकारी सीईओ मनीषा खत्री आहे व त्यांनी महिला मतदार जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर जागृती व विशेष अभियान गावागावांत राबविल्यामुळे यंदा महिला मतदानाचे टक्केवारी वाढणार असक्याचा निवडणूक विभागाचा अंदाज आहे.
मागील निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील १६ लाख आठ हजार ८८८ मतदारांपैकी पाच लाख ५४ हजार ६५७ पुरूष व चार लाख ४६ हजार ४८६ महिला अशा एकूण १० लाख एक हजार १४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याची टक्केवारी ६२.३३ एवढी होती व आतापर्यतची सर्वाधिक टक्केवारी होती. यामध्ये पुरूषांचे मतदान ६५.५४ टक्के तर महिला मतदानाचे टक्का ५८.५५ टक्के होता. यामध्ये तिवसा विधानसभा मतदारसंघात पुरूषांच्या ५६.२२ टक्के मतदानाच्या तुलनेत महिलांचा टक्का ५६.३० टक्के राहिला.

विधानसभानिहाय महिला मतदार
बडनेरा विधानसभा मतदारसंघात एक लाख ७१ हजार १७०, अमरावती एक लाख ६६ हजार ६९, तर तिवसा विधानसभा मतदारसंघात एक लाख ४२ हजार ८६९ महिला मतदार आहेत.

बडनेरा विधानसभा मतदारसंघात एक लाख ७१ हजार १७०, अमरावती एक लाख ६६ हजार ६९, तर तिवसा विधानसभा मतदारसंघात एक लाख ४२ हजार ८६९ महिला मतदार आहेत.

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात एक लाख एक ४१ हजार १३८, मेळघाट एक लाख ३२ हजार ३४४ व अचलपूर मतदारसंघात एक लाख ३१ हजार ५०३ महिला मतदार आहेत.

यंदा १८ ते १९ वयोगटात १२७१५, २० ते २९ वयोगटात २०३०१८, ३० ते ३९ वयोगटात २७२१६७, ४० ते ४९ वयोगटात २५२९७५, ५० ते ५९ वयोगटात १८९० ५४, ६० ते ६९ वयोगटात ११४१९१, ७० ते ७९ वयोगटात ७३०२५ व ८० वर्षावर ४९३३७ महिला मतदार आहेत.


Web Title: Lok Sabha Election 2019; The percentage of women power, who will push?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.