‘सौभाग्य’तून १४ गावांत प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:20 AM2018-04-26T01:20:46+5:302018-04-26T01:20:46+5:30

महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे.

Light of 14 villages in 'Good luck' | ‘सौभाग्य’तून १४ गावांत प्रकाश

‘सौभाग्य’तून १४ गावांत प्रकाश

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरण : 'एससी' वस्त्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे.
यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुलआमला, बेलोरा हिरापूर, सारसी, पिंपळगाव निपाणी, चांदूर रेल्वे तालुक्यातील कळंबगाव, निंभा दर्यापूर तालुक्यातील शिवर (खु.), धामोडी, रामतीर्थ, शिवर (बु.), नलवडा आदी गावांचा, तर अमरावती तालुक्यातील कापूस तळणी, पिंपरी आणि भातकुली तालुक्यातील निंभा, गावाचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, म्हणजेच सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट्य आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानात जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील १४ 'एससी' वस्त्यांमध्ये शंभर टक्के वीजजोडणी देण्यात आल्याने गोरगरीब कुटुंबे प्रकाशात आली आहेत.
प्रत्येक गावात विशेष मेळावा
ज्या गावात ८० टक्क्यांपेक्षा अधिक 'एससी'वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा गावांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी महावितरण अमरावती परिमंडळाच्या वतीने प्रत्येक गावात विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले व लाभार्थ्यांना तत्काळ वीजजोडणी देऊन १४ ते २२ एप्रिल या आठ दिवसांत जिल्ह्यातील १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये विद्युतीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Light of 14 villages in 'Good luck'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.