अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची डाव्या हाताची तर्जनी लोकसभेसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 11:32 AM2019-03-22T11:32:24+5:302019-03-22T11:33:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील खेल देवमाळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्याची ओळख म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीला पक्की शाई ...

Left-hand index of citizens of Amravati district reserved for Lok Sabha | अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची डाव्या हाताची तर्जनी लोकसभेसाठी राखीव

अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची डाव्या हाताची तर्जनी लोकसभेसाठी राखीव

Next
ठळक मुद्देदोन्ही हातांच्या तर्जनीवर लागणार मतदानाची शाईनिवडणूक आयुक्तांचे निर्देश खेल देवमाळी ग्रामपंचायत निवडणुकीत उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील खेल देवमाळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्याची ओळख म्हणून उजव्या हाताच्या तर्जनीला पक्की शाई लावण्यात येणार आहे, तर लोकसभा निवडणुकीसाठी डाव्या हाताच्या तर्जनीला लोकसभा निवडणुकीत शाई लावण्यात येणार आहे. याविषयीचे आदेश राज्याचे निवडणूक आयुक्तांनी बुधवारी दिलेत.
भारत निवडणूक आयोगाद्वारा राज्यातील ४८ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने २० फेब्रुवारीला ५५७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक व ८२ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचाची पोटनिवडणूक तसेच २१ फेब्रुवारीच्या आदेशाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त सदस्यपदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. याव्यतिरिक्त पालघर, सिंदखेड राजा व लोणार नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या सर्व निवडणुकीसाठी २४ मार्चला मतदान होणार आहे. जिल्ह्यात खेल देवमाळी या ग्रामपंचायतीची निवडणूक या प्रक्रितेत होणार आहे. आयोगाच्या ९ आॅक्टोबर २०१२ चे आदेशाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मतदाराची ओळख पटल्यावर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला न मिटणारी पक्की शाई लावण्याचे निर्देश मतदान केंद्राध्यक्षांच्या अभ्यास पुस्तिकेत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २४ मार्चचे निवडणुकीत कोणत्या बोटाला शाई लावावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी सायंकाळी निवडणूक आयुक्तांनी याचे निरसन केले आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात लोकसभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीतदेखील मतदाराची ओळख पटल्यावर त्याचे डाव्या हाताच्या तर्जनीला पक्की शाई लावण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुकांमध्ये कुठलाच पेच निर्माण होऊ नये, यासाठी २४ मार्चला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या डाव्या हाताचे तर्जनीला न मिटणारी पक्की शाई न लावता उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचे निर्देश देण्याची विनंती उपसचिव अ.ना. वळवी यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना केली होती. त्यानुसार निवडणूक आयुक्तांनी बुधवारी निर्देश जारी केले आहेत.

Web Title: Left-hand index of citizens of Amravati district reserved for Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.