कोकण, पुणे पावसात अव्वल; मराठवाडा माघारला, धरणांतील जलसाठा ५७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 03:51 PM2018-08-20T15:51:37+5:302018-08-20T15:52:10+5:30

Konkan, Pune tops in rain | कोकण, पुणे पावसात अव्वल; मराठवाडा माघारला, धरणांतील जलसाठा ५७ टक्क्यांवर

कोकण, पुणे पावसात अव्वल; मराठवाडा माघारला, धरणांतील जलसाठा ५७ टक्क्यांवर

Next

- प्रदीप भाकरे
अमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्याचे उणेपुरे ४० दिवस शिल्लक असताना राज्यातील ३,२६६ प्रकल्पांमध्ये १९ आॅगस्टअखेर केवळ ५७.६० टक्के पाणी साचले आहे.गतवर्षी हेच प्रमाण ५२.२० टक्के असे होते.
तूर्तास अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ४३.४६ टक्के, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९०.१३ टक्के, नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये ३९.३७ टक्के, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ५३.२० टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ७९.१५ टक्के, तर मराठवाड्यातील ९६४ प्रकल्पांमध्ये केवळ २०.८५ टक्के जलसाठा आहे.

राज्यातील १४२ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६५.१० टक्के, २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये ४६.५५ टक्के व २८६६ लघूप्रकल्पांमध्ये अवघा ३२.६७ टक्के जलसाठा आहे. अन्य पाच प्रदेशांच्या तुलनेत मराठवाडा सन २०१६ प्रमाणे दुष्काळाशी झगडत आहे. मराठवाड्यातील ४५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.१६ टक्के, ८१ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.५० टक्के व ८३८ लघू प्रकल्पांमध्ये अवघा १७.५७ टक्के जलसाठा आहे. एकूणच मराठवाडा प्रदेशाची जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. 

मोठ्या प्रकल्पातील जलसाठा
काटेपूर्णा (अकोला)    - ४९.७२
वाण (अकोला)    - ६७.००
उर्ध्व वर्धा (अमरावती)    - ४६.३५
खडकपूर्णा (बुलडाणा)    - ०
नळगंगा (बुलडाणा)    - १४.१९
अरुणावती (यवतमाळ)    - ८१.६५
पूस (यवतमाळ)    - ९९.९८
नांद (नागपूर)    - ७५.४६
गोसे खुर्द (भंडारा)    - ३०.७५
निम्न वर्धा (वर्धा)    - २८.८७
असोळा मेंढा (चंद्रपूर)    - ९२.८२
दिवा (गडचिरोली)    - ८१.४१

९०८ गाववाड्यांमध्ये टँकरवारी
१३ आॅगस्टअखेर राज्यातील ५६७ गावे व ३४१ वाड्यांमध्ये ५९३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागात १०२, पुणे विभागात १४, मराठवाड्यात ४३५, तर अमरावती विभागातील बुलडाण्यात ४२ टँकरने पाणी पोहोचविले जात आहे. यात ७५ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे.

Web Title: Konkan, Pune tops in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.