पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा प्रश्न अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:07 PM2017-12-18T22:07:33+5:302017-12-18T22:07:55+5:30

तालुक्यात लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची मागणी सातत्याने केली जात आहे.

Inquiries of Veterinary Clinic | पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा प्रश्न अधांतरी

पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा प्रश्न अधांतरी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वेळा लक्षवेधी : पशुधनाची शासनाला काळजीच नाही

सुमित हरकूट
आॅनलाईन लोकमत
चांदूरबाजार : तालुक्यात लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु, हा प्रश्न गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे. पशुधनाला योग्य आरोग्य उपचार मिळत नसल्यामुळे आपले पशुधन विकायची वेळ पशुमालकांवर येऊन ठेपली आहे.
शेतकऱ्यांचे पशुधन ही संपती असल्याने त्यांचे आरोग्य अबाधित राहिल्यास त्यांच्यापासून आर्थिक लाभ होतो. त्यामुळेच जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावे, यासाठी सरकारने शासकीय यंत्रणा उभारली आहे. मात्र, चांदूर बाजार येथील पशू चिकित्सालयात पुरेसा साधन सामग्री नसल्याने पशूपालकांची व जनावरांची परवड होत असल्याचे चित्र आह. सात वर्षापूर्वी ४ नोव्हेंबर २०१० रोजी स्थानिक पंचायत समितीने सर्वसाधारण मासिक सभेत जनावरांसाठी मिनी पॉलीक्लिनिकचा ठराव घेतला होता. आ. बच्चू कडू यांनी दोनदा लक्षवेधी लावूनही हा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे.
आ. कडू यांनी १८ मार्च २०१६ ला हे प्रकरण प्रधान सचिव, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास यांच्याकडे लावून धरले. पशुसंवर्धन मंत्री यांच्यासोबत चर्चाही केली. आ. अनिल बोंडे व आ. विनायक पाल यांनी यास अनुमोदनही दिले होते. परंतु विधिमंडळ सभागृहात आश्वासना शिवाय काहीच हाती आले नाही.
तालुक्यात ७५ हजार २३४ पशुधन
२०१२ च्या पशुगणनेनुसार सध्या तालुक्यात ७५ हजार २३४ पशुधनाची संख्या आहे. यात गाय-बैल ३२ हजार ४९३, रेडे-म्हैस ८ हजार २८७, शेळ्या २७ हजार ८१, मेंढर २ हजार १७८, घोडे ३३, गाढवे ११७ व वराह ३६९ याप्रमाणे आहेत. तालुक्याच्या ठिकाणी लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय झाल्यास सर्वच जनावरांना सोनोग्राफी, क्ष-किरण, रक्त तपासणी सेवा यासारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. सध्या तालुक्यात १३ पशुवैद्यकीय दवाखाने असून यात सात प्रथम श्रेणी व सहा द्वितीय श्रेणी दवाखाने आहेत.

Web Title: Inquiries of Veterinary Clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.