Increase the status of state service to 69 | राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करा
राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करा

ठळक मुद्देविद्यार्थ्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्य सेवेतील ६९ पदांमध्ये वाढ करण्यात यावी, यांसह इतर मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
केंद्रात रिक्त असणारी १ लाख ६० हजार व राज्यातील ४ लाख २० हजार पदे त्वरित भरण्यात यावीत. परिक्षा शुल्काला जीएसटी नसावे. सर्व जाती, धर्मातील विद्यार्थ्याना समान शुल्क आकारावे. पोलीस पदभरती संख्येत वाढ करावी. राज्यात पदभरतीसाठी तामिळनाडू पॅटर्न राबविण्यात यावा. खाजगी तत्त्वावर कंत्राटी पदभरती न करता कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात यावी. बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी यांसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवेदन देताना सारंग जवखेडे, गजानन काललकर, मनीष बूल, आशिष गवार, आकाश ठाकूर, प्रणव निमकर, हर्षल धांडे, सुुशांत पोरे, अक्षय राऊत, प्रतीक निंबोरकर, संजय तांबे, राहुल गंधे, सुरज सोळंके आदी युवक उपस्थित होते.


Web Title: Increase the status of state service to 69
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.