अमरावतीत आयकर विभागाकडून धाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 01:25 PM2019-01-16T13:25:22+5:302019-01-16T13:32:25+5:30

आयकर विभागाचे धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. 

income tax department raid in Amravati | अमरावतीत आयकर विभागाकडून धाडी

अमरावतीत आयकर विभागाकडून धाडी

Next
ठळक मुद्देआयकर विभागाचे धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. ‘इन कॅमेरा’ चौकशीसाठी कॅमेराची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

अमरावती - शहरात आयकर विभागाचे धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. 

अमरावती शहरात बुधवारी सकाळी १० वाजतापासून उद्योजक, व्यापारी, बिल्डरांकडे आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या आहेत. प्रत्येकी पाच अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या २७ पथकांनी या धाडी टाकल्या. हे अधिकारी व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी दस्तावेज तसेच इतर कागदपत्रांची छाननी करीत आहेत. या पथकाला रायफलधारी पोलिसाचा बंदोबस्त देण्यात आला आहे. ‘इन कॅमेरा’ चौकशीसाठी कॅमेराची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. 

दरम्यान, ही कार्यवाही दोन ते तीन दिवस चालेल. त्यानंतर यासंबंधी अहवाल तयार केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

प्रवीण मालूंचीही चौकशी 

अमरावती येथील प्रख्यात बिल्डर प्रवीण मालू यांच्या घर व कार्यालयाचीही आयकर विभागाच्या एका पथकाकडून झडती घेणे सुरू केले आहे. 

Web Title: income tax department raid in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.