शेंडगावच्या स्मशानभूमीत बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:46 PM2018-08-14T22:46:27+5:302018-08-14T22:46:43+5:30

गाडगेबाबांच्या शेंडगावसाठी लाखो रुपयांचा विकासनिधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. पण, आजपर्यंत निधी प्राप्त न झाल्याने माजी सरपंचासह ग्रामस्थ स्मशानभूमीमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १५ आॅगस्टपासून लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय झाला आहे.

Incessant hunger strike in Shandgaon crematorium | शेंडगावच्या स्मशानभूमीत बेमुदत उपोषण

शेंडगावच्या स्मशानभूमीत बेमुदत उपोषण

Next
ठळक मुद्देगाडगेबाबांच्या गावाला ठेंगा : १५ आॅगस्टपासून लोकप्रतिनिधींना गावबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : गाडगेबाबांच्या शेंडगावसाठी लाखो रुपयांचा विकासनिधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. पण, आजपर्यंत निधी प्राप्त न झाल्याने माजी सरपंचासह ग्रामस्थ स्मशानभूमीमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १५ आॅगस्टपासून लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय झाला आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ मे २०१६ रोजी शेंडगाव येथील १८ एकर जागेमध्ये संत गाडगेबाबा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले आणि आपल्या भाषणातून गाव व परिसरात विकास आराखड्यासाठी २५ कोटी रूपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण, दोन वर्षे होऊन धड एका रुपयाचाही विकास शेंडगावात झालेला नाही. अनावरण केलेला पुतळासुद्धा ऊन, वारा, पाण्याचा मारा सोसत उभा आहे.
या मुद्द्यावर माजी सरपंच गोपाल गावनेर, ज्योती मंडलिक, प्रतिभा काटकर, रामदास आदी बेमुदत उपोषणाला गावातील स्मशानभूमीत बसलेले आहे. या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने लोकप्रतिनिधींनासुद्धा १५ आॅगस्टपासून गावबंदी केली आहे.

लोकप्रतिनिधींना गावबंदी
जोपर्यंत विकासाची प्रत्यक्ष अनुभूती उपोषणकर्त्यांना येत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी यांना शेंडगावात गावबंदी राहणार आहे. १५ आॅगस्टपासूनच त्यावर अंमल केला जाणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.

ग्रामविकास मंत्र्यांकडून २५ कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला. परंतु, शिखर समितीचा अभिप्राय मिळू न शकल्याने निधी मिळण्यास विलंब होत आहे. अभिप्राय मिळताच लवकरच विकासकामे सुरू करू.
- रमेश बुंदीले, आमदार

स्थानिक आमदारांना विचारले असता, २५ कोटींचा विकास आराखडा तयार असल्याचे सांगण्यात येते. परंतु, घोडं कुठं अडलं, हे समजायला मार्ग नाही.
- गोपाल गावनेर,
माजी सरपंच, शेंडगाव

Web Title: Incessant hunger strike in Shandgaon crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.