अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार मदतीचा हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:37 PM2018-05-22T18:37:30+5:302018-05-22T18:37:39+5:30

राज्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा, यासाठी राज्य सरकारने ७.६९ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Help to students injured in accident! | अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार मदतीचा हात!

अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार मदतीचा हात!

googlenewsNext
ठळक मुद्दे७.६९ कोटींची राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा, यासाठी राज्य सरकारने ७.६९ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत ४८४ लाभार्थ्यांसह वर्षभरात प्राप्त होणाऱ्या दाव्यांची प्रतिपूर्ती करण्यासाठी ही रक्कम वितरित करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींना अपघातामुळे होणाऱ्या क्षतीची नुकसानभरपाई देण्यासाठी सन २०१२-१३ पासून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविली जाते. त्या योजनेंतर्गत ७ कोटी ६९ लाख ६५ हजार निधी वितरित केला जाईल. सन २०१८-१९ मधील ४८४ अपघातग्रस्त लाभार्थ्यांसह मार्च २०१९ पर्यंत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांसाठी ही रक्कम खर्च होईल.

शालेय पोषण आहारासाठी ३०७ कोटी
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन २०१८-१९ साठी ३०७.१६ कोटी रूपये वितरित केले जातील. यात केंद्राचे १९२ कोटी व राज्याचे ११४ कोटी रूपये आहेत. महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांसाठी हा निधी असेल. हा निधी वितरणास १५ मे रोजी मान्यता देण्यात आली.

Web Title: Help to students injured in accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात