ग्रामपंचायत कर्मचा-यांचे होणार नगरपंचायतीमध्ये समायोजन, अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांची सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 04:18 PM2017-12-06T16:18:55+5:302017-12-06T16:19:11+5:30

अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे

Gram panchayat employees will be able to make adjustments in the Nagar Panchayat, three year concession for the fulfillment of qualifications | ग्रामपंचायत कर्मचा-यांचे होणार नगरपंचायतीमध्ये समायोजन, अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांची सवलत

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे होणार नगरपंचायतीमध्ये समायोजन, अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांची सवलत

Next

जितेंद्र दखने 
अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे, तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असणा-या कर्मचा-यांना संबंधित तांत्रिक अर्हतेच्या पूर्ततेसाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

तत्कालीन ग्रामपंचायतीमधील कार्यरत कर्मचा-यांची शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेची पूर्तता नसणे, आकृतिबंधात पदे उपलब्ध नसणे अथवा पदसंख्या कमी असणे आदी कारणांमुळे नगरपंचायत स्थापनेपूर्वी कर्मचा-यांच्या समायोजनासंदर्भात अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे. या तरतुदीनुसार नवनिर्मित नगरपंचायतीमधील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पात्र असूनही समायोजन न झालेल्या कर्मचा-यांना जिल्ह्यातील अन्य नगरपंचायतींमधील रिक्त पदांवर घेतले जाणार आहे. याकरिता ज्येष्ठता व अर्हतेनुसार क्रम ठरवला जाणार आहे. ज्या कर्मचा-यांची नगरपंचायत घोषणेपूर्वी नियुक्ती झाली आहे, अशा कर्मचा-यांचे पदे उपलब्ध नसल्याने समायोजन न झाल्यास त्यांच्या वेतनाची पदे उपलब्ध होईपर्यंतची जबाबदारी संबंधित नगरपंचायतीवर राहणार आहे. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीने समावेशनासाठी शिफारस केलेल्या कर्मचाºयांना संबंधित नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांनी दोन आठवड्यांच्या आत नियुक्ती आदेश देणे गरजेचे आहे.

मोठ्या ग्रामपंचायत कर्मचा-यांना बसणार फटका
अनेक ग्रामपंचायतींमध्ये राजकीय सोय लक्षात घेऊन नोकरभरती करण्यात आली. नगरपंचायतीकरिता शासनाने ठरविलेला आकृतिबंध बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त कर्मचा-यांचे समायोजन इतर नगरपंचायतींमध्ये होऊ शकते.

Web Title: Gram panchayat employees will be able to make adjustments in the Nagar Panchayat, three year concession for the fulfillment of qualifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.