मुलीचे लग्न सुरू असतानाच जळत होते घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:05 AM2019-05-20T01:05:06+5:302019-05-20T01:05:28+5:30

एकीकडे मुलीचा विवाह सोहळा, तर दुसरीकडे घर आगीत जळत आहे. अशा दुहेरी संकटात तलवारे कुटुंबातील मुलीचा लग्न सोहळा वलगावातील संत गाडगेबाबा निर्वाणभूमित पार पडला. आगीमुळे तलवारे कुटुंबीयांची धावपळ तर वऱ्हाड मंडळीची तारांबळ उडाली.

The girl's marriage started burning at the same time | मुलीचे लग्न सुरू असतानाच जळत होते घर

मुलीचे लग्न सुरू असतानाच जळत होते घर

Next
ठळक मुद्देवऱ्हाड मंडळीची ताराबंळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकीकडे मुलीचा विवाह सोहळा, तर दुसरीकडे घर आगीत जळत आहे. अशा दुहेरी संकटात तलवारे कुटुंबातील मुलीचा लग्न सोहळा वलगावातील संत गाडगेबाबा निर्वाणभूमित पार पडला. आगीमुळे तलवारे कुटुंबीयांची धावपळ तर वऱ्हाड मंडळीची तारांबळ उडाली.
बाजारपुऱ्यातील रहिवासी गजानन देविदास तलवारे यांच्या मुलगी वैष्णवीचे गोपाल देविदास सैरीसे (रा.अळणगाव, ता.भातकुली) याच्याशी लग्न जुळले. महिन्याभरापासून गजानन तलवारे मुलीच्या लग्नाच्या तयारीला लागले होते. पैसा व दागिन्यांची जुळवाजुळव केली. लग्नाचा तो दिवस उजाडला. रविवारी सकाळीच सर्व कुटुंबीय लग्नस्थळी पोहोचले. बॅन्डबाजासह वरात निघाली. नाचत गाजत सोहळ्याचा आनंद तलवारे व सैरीसे कुटुंबीय घेत होते. दरम्यान, सकाळी १० वाजता घराला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. लग्न समारंभ सुरू असतानाच तलवारे कुटुंबातील पुरुष मंडळीने बाजारपुºयातील घराकडे धाव घेतली. आगीचे लोळ पाहून त्यांची भंबेरीच उडाली. घरातील सर्व साहित्यांसह धान्य, रोख व दागिने जळाल्याचे पाहून तलवारे कुटुंबीयांना धक्काच बसला. एकीकडे लग्न सोहळा सुरू आहे, तर दुसरीकडे घर जळत असल्याने तलवारे कुटुंबीय दुहेरी संकटात सापडले होते. लग्न सोहळा पार पडल्यानंतर मुलगी सासरी जाईल, हे दुख उराशी असताना तलवारे कुटुंबीय उघड्यावर आले. लग्नानंतर जावयासोबत मुलगी घरी आल्यावर त्यांना कुठे निवारा द्यायचा, अशा प्रश्न त्यांना पडला आहे. लग्नाला पैसा लागला, आता घर उभे करण्यासाठी पैशांची तरतूद कशी करावी, या विवंचनेत तलवारे कुटुंबीय सापडले आहे.

Web Title: The girl's marriage started burning at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग