महापालिकेच्या शिरावर ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:04 PM2017-12-10T23:04:02+5:302017-12-10T23:04:21+5:30

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या चार हजार गुणांच्या ‘स्वच्छ’ परीक्षेत अग्रक्रमावर येण्यासाठी कामास लागलेल्या महापालिकेच्या मानगुटीवर तूर्तास ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत बसले आहे.

The ghost of 'cleanliness app' at the municipal body | महापालिकेच्या शिरावर ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत

महापालिकेच्या शिरावर ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत

Next
ठळक मुद्दे१३ हजारांचे लक्ष्य : कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनिवार्य

आॅनलाईन लोकमत
अमरावती : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या चार हजार गुणांच्या ‘स्वच्छ’ परीक्षेत अग्रक्रमावर येण्यासाठी कामास लागलेल्या महापालिकेच्या मानगुटीवर तूर्तास ‘स्वच्छता अ‍ॅप’चे भूत बसले आहे. महापालिकेला लोकसंख्येच्या तुलनेत १२,९४१ 'अ‍ॅप'चे उद्दिष्ट असून रविवारअखेर महापालिका क्षेत्रातून ६९३५ अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहेत. अर्थात ३१ डिसेंबरपर्यंत महापालिकेला ६ हजार अ‍ॅप डाऊनलोड करवून घेण्याचे आव्हान आहे.
महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘जळी-स्थळी-काष्टी-पाषानी स्वच्छता अ‍ॅप दिसत असल्याचे हसरी प्रतिक्रिया उमटली असून हा अ‍ॅप डाऊनलोड करणे त्यांना बंधनकारक केले आहे. २०१८ च्या जानेवारी महिन्यात ४००० गुणांचे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. अधिकाधिक स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्याप्रमाणे समस्येचा निपटारा करणाºया महापालिका, नगर पालिकांना त्यासाठी ४०० गुण मिळणार आहेत. अ‍ॅप डाउनलोडिंगच्या रँकिंंगमध्ये शहर कुठल्या क्रमांकावर आहे, यावर हे गुणांकन ठरणार असल्याने अ‍ॅप डाऊनलोडिंगवर भर दिला जात आहे.
महापालिकेत तूर्तास १६०० च्या संख्येत अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांश जणांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल आहेत. स्वच्छ सर्वेक्षण हे महापालिकेच्या गुणांकनासाठी अगत्याचे असल्याने प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचाºयांना हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर स्वच्छता विषयक तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर आलेल्या तक्रार २४ तासांच्या आत सोडविणे अनिवार्य असून, ती तक्रार किती कालावधीत सोडविली गेली, यावरही गुण अवलंबून आहेत. २ आॅक्टोबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली. स्वच्छ सर्वेक्षणाचे चौथ्या वर्षात देशातील ४,०४१ शहरे सहभागी झाले आहेत. यात स्वच्छतेबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्यात, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छता अ‍ॅपची सुरुवात झाली. शहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिक तक्रार करू शकतात. कचºयाचा फोटो काढून स्वच्छता अ‍ॅपवर टाकल्यास मनपाद्वारे २४ तासांच्या आत त्यावर कारवाई करण्यात येते. त्या तक्रारींचे निवारण योग्यरीत्या झाले नसल्यास नागरिक नकारात्मक अभिप्राय नोंदवू शकतात. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत किती स्वच्छता अ‍ॅप डाऊन लोड केले, त्या संख्येवर १५० गुण असले तरी लक्ष्यापेक्षा अधिक डाऊनलोडिंग आणि समस्यांचा निपटाºयाचा वेगावर ४०० गुण अवलंबून असतील.

शहराला २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत १२,९४१ स्वच्छता अ‍ॅपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी स्वच्छता विभाग सतत कार्यरत आहे. आतापर्यंत ७ हजार अमरावतीकरांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करुन स्वच्छताविषयक तक्रारी नोंदविल्या आहेत.
- हेमंत कुमार पवार,
महापालिका, आयुक्त

-तर वेतन कपात
महापालिकेतील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करावे, अन्यथा वेतन कपात करण्याचा अप्रत्यक्ष तंबीच प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मनपाचे अधिकारी - कर्मचारी असले तरी तेही अमरावतीकरच असल्याने त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात सक्रिय सहभाग द्यावा, असा त्यामागची भूमिका आहे.

Web Title: The ghost of 'cleanliness app' at the municipal body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.