कचराभूमीतील आग कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:09 AM2018-11-16T01:09:17+5:302018-11-16T01:10:42+5:30

सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत.

Garbage Fire Forever! | कचराभूमीतील आग कायमच!

कचराभूमीतील आग कायमच!

googlenewsNext
ठळक मुद्देआयुक्तांकरवी दिशाभूल : काय झाले कंपोस्ट खताचे?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत.
अत्यंत घातक प्रदूषण निर्माण करणारी ही आग तत्काळ प्रभावाने नियंत्रित करण्यासाठी प्रभावी पावले उचलणे हे महापालिकेचे कर्तव्य होते. परंतु कारवाई केल्याचा देखावा करणारे महापालिका आयुक्त लोकारोग्याबाबत गंभीर नाहीत, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही महापालिका आयुक्तांनी केवळ 'कागदोपत्री' पाऊले उचलून हजारो लोकांना डेंग्युच्या विळख्यात जखडू दिले. अनेकांना त्यामुळे प्राणासही मुकावे लागले. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, पालकंमंत्री प्रवीण पोटे यांनी या मुद्याची दखल घेऊन चौकशीचे आदेश देखील दिले होते. तरीही डेंग्युचा डंख नागरिकांना होत राहिला. पर्यावरण राखण्याच्या मुद्यासंबंधी केंद्र शासनाच्या कठोर कायद्यांना आयुक्त हुलकावणी देत असल्यामुळे सुकळीतील 'गॅस चेंबर'ही नागरिकांचे बळी घेणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Garbage Fire Forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.