बजरंग टेकडीतील अतिक्रमणावर गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:09 PM2018-04-20T22:09:40+5:302018-04-20T22:09:40+5:30

राजापेठ बसस्थानकामागे असलेल्या बजरंग टेकडी भागातील अतिक्रमण शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली.

Gajraj on the encroachment in Bajrang hill | बजरंग टेकडीतील अतिक्रमणावर गजराज

बजरंग टेकडीतील अतिक्रमणावर गजराज

Next
ठळक मुद्देपथकाविरुद्ध रोष : झोपड्यांसह पक्के बांधकाम तोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ बसस्थानकामागे असलेल्या बजरंग टेकडी भागातील अतिक्रमण शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली.
बालाजी प्लॉटलगत असलेल्या बजरंग टेकडी भागात अनेक जणांनी नझूलच्या जागेवर अतिक्रमण करुन झोपड्या बांधल्या आहेत, तर नवनीत चांडक नामक इसमाने तेथे टिनशेड व अन्य बांधकाम केले होते. या झोपड्यांसह चांडक यांनी बांधलेले टिनशेड व २ दुकाने व एक गॅरेज असे ४ हजार चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली, तर सात झोपड्यांवर गजराज फिरविण्यात आला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन कारवाई करतेवेळी अतिक्रमणधारकांनी जोरकस विरोध केला. मात्र, त्या विरोधाला भीक न घालता कुत्तरमारे आणि त्यांच्या पथकाने अतिक्रमण उद्ध्वस्त केले. मागील अनेक वर्षांपासून या भागात झोपड्या थाटून काहींनी अतिक्रमण केले होते. पोलीस विभागाची या कारवाईसाठी मदत घेण्यात आली. हे अतिक्रमण हटविण्यासाठी येथील नागरिकांनी महापालिकेशी बरेचदा पत्रव्यवहार केला होता. त्याअनुषंगाने ही व्यापक कारवाई करण्यात आली. या कारवाईसोबतच इतवारा बाजार व रात्री होणाऱ्या अतिक्रमणावर लवकरच मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कुत्तरमारे यांनी दिली.
शहराच्या अनेक भागात रात्री हातगाडी व अन्नपदार्थ विकणाºयांचे अतिक्रमण वाढले आहे.

Web Title: Gajraj on the encroachment in Bajrang hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.