अमरावती- सुरत एक्स्प्रेससह चार पॅसेंजरच्या फे-या सुरू, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 08:39 PM2019-04-23T20:39:44+5:302019-04-23T20:39:59+5:30

भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रस्तावित विविध विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. दरम्यान, मेगा ब्लॉकमध्ये शिथिलता आली असून, रद्द करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Four Passenger Fees With Amravati-Surat Express, Relaxed To The Travelers | अमरावती- सुरत एक्स्प्रेससह चार पॅसेंजरच्या फे-या सुरू, प्रवाशांना दिलासा

अमरावती- सुरत एक्स्प्रेससह चार पॅसेंजरच्या फे-या सुरू, प्रवाशांना दिलासा

googlenewsNext

अमरावती : भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रस्तावित विविध विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. दरम्यान, मेगा ब्लॉकमध्ये शिथिलता आली असून, रद्द करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. सुरत-अमरावती एक्स्प्रेस ही गाडी शुक्रवारी या स्थानकाहून अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचेल तसेच चार पॅसेंजरच्या फेºया सुरू झाल्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
      भुसावळ रेल्वे स्थानकावरील विकासकामांच्या पूर्ततेसाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही मोठी कामे पूर्णत्वास आल्याने अमरावती-सुरत एक्स्प्रेस आणि चार पॅसेंजर गाड्यांच्या फेºया सुरू झाल्या आहेत. यात भुसावळ-वर्धा-बल्लारशा (गाडी क्रमांक ५११५७), वर्धा-भुसावळ (५११९८), भुसावळ-नरखेड (५११८३) आणि नरखेड-भुसावळ (५११८४) या पॅसेंजर २१ एप्रिलपासून नियमित सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, रद्द झालेल्या नागपूर, बडनेरा लोहमार्गाने ये-जा करणाºया मेल, एक्स्प्रेस या गाड्या अद्यापही प्रारंभ झाल्या नाहीत. अमरावती-सुरत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याने सुरतकडे जाणाºया प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Four Passenger Fees With Amravati-Surat Express, Relaxed To The Travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.