वित्त अधिकारी-झेडपी अध्यक्षांमध्ये वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:32 PM2018-12-14T22:32:38+5:302018-12-14T22:33:06+5:30

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) रवींद्र येवले यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. कॅफोंविरोधात गेल्या शुक्रवारी अध्यक्षांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. त्याची चौकशी सुरू असतानाच कॅफो येवले यांनीही ८ डिसेंबर रोजी अध्यक्षांकडून पदाचा गैरवापर, नियमबाह्य ठराव असे आक्षेप घेत विभागीय आयुक्तांकडे मेलवर तसेच लेखी स्वरूपात त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

The finance officer-ZP president raised objections | वित्त अधिकारी-झेडपी अध्यक्षांमध्ये वाद पेटला

वित्त अधिकारी-झेडपी अध्यक्षांमध्ये वाद पेटला

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांकडे तक्रार : गोंडाणे यांना पदावरून हटविण्याची कॅफोंची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) रवींद्र येवले यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. कॅफोंविरोधात गेल्या शुक्रवारी अध्यक्षांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. त्याची चौकशी सुरू असतानाच कॅफो येवले यांनीही ८ डिसेंबर रोजी अध्यक्षांकडून पदाचा गैरवापर, नियमबाह्य ठराव असे आक्षेप घेत विभागीय आयुक्तांकडे मेलवर तसेच लेखी स्वरूपात त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.
जिल्हा परिषदेच्या जानेवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेत ३८ ठराव नियमबाह्य असल्याने विभागीय आयुक्तांनी ते रद्दबातल ठरविले. याशिवाय जिल्हा परिषदेच्या निधीची १०० कोटींची एफडी ही राष्ट्रीयीकृत बँकेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून करण्यात आली. अशातच सत्तापक्षाने घेतलेले काही ठराव नियमबाह्य असल्याने कॅफोंनी अपेक्षित अभिप्राय दिला नाही. यावरून खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे येवले यांनी नमूद केले.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तक्रारीवर तीन सदस्यी समिती चौकशी करीत आहे. पुन्हा ७ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्ताकडे येवले यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी अध्यक्षांनी केली. याप्रकरणी विभागीय आयुक्त कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षांना पदच्युत करा
जिल्हा परिषद अध्यक्षांनी वारंवार खोट्या तक्रारी केल्या तसेच निलंबनासाठी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली. प्रशासन व कॅफो यांच्यावर दबाब आणला जात असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ५० नुसार अध्यक्षांना पदावरून हटविण्याची मागणी आयुक्तांकडे येवले यांनी मेलवर आणि लेखी स्वरूपात केली.
कॅफोंची मनमानी
मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे विकासकामात अडचणी आणत आहेत. त्यांच्या हेकेखोरपणामुळे विकासकामे खुटंली आहेत. १०० कोटींची एफडी करताना पदाधिकाºयांना विश्वासात न घेताच कारभार केला. नियमानुसार असलेल्या ठरावांवर चुकीचे अभिप्राय नोंदविले. न झालेल्या कामाची देयके अदा केली. त्यामुळे त्यांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केल्याचे अध्यक्ष नितिन गोंडाणे यांनी सांगितले.

अध्यक्षांच्या सोईचे अभिप्राय नोंदविले नसल्याने मला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
- रवींद्र येवले, कॅफो, जिल्हा परिषद

कॅफोंनी त्यांच्या शेताच्या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये निधी मागितला. ते सभागृहाचे सदस्य नाही, अधिकारी आहेत. वैयक्तिक स्वरूपाची तक्रार नाही.
- नितीन गोंडाणे, जिल्हा परिषद अध्यक्ष

Web Title: The finance officer-ZP president raised objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.