Filling the container's automobile; Eight serious | भरधाव कंटेनरची आॅटोला धडक; आठ गंभीर
भरधाव कंटेनरची आॅटोला धडक; आठ गंभीर

ठळक मुद्देचिमुकली बचावली : परतवाडा अकोला मार्गावरील येनी पांढरीनजीक अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील कंटेनरने अंजनगावकडे जाणाऱ्या आॅटोरिक्षाला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास परतवाडा-अकोला मार्गातील येनी पांढरीजवळ हा अपघात घडला.
विद्या उमेश पवार (३५, रा. अंजनगाव), मोनाली राजेंद्र सोळंके (२७, अंजनगाव), रमेश रामराव थोटे (४५, निंभा ता. बाळापूर), भरत गणपतराव रावळकर (६०. रा. गावंडगाव), मोहम्मद इजाज मोहम्मद बहोद्दीन (२५, अंजनगाव), बानूबी (६०, रा. शिरजगाव), नजमाबी शाह (६५, शिरजगाव), माधवी अरविंद सावरकर (२०) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
एमएस २७ एआर ०२३६ क्रमांकाच्या आॅटोरिक्षा प्रवासी अंजनगावकडे नेत असताना पांढरीनजीक फाट्यावर एमएच २७ बीएक्स १९९७ क्रमांकाच्या टँकरने जोरदार धडक दिली. त्यात आॅटोतील सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, पाठीला, कमरेला, पायाला गंभीर इजा झाली. या सर्व जखमींना सावळी येथील प्यारेलाल प्रजापती व रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठविले. त्या सर्वांना अमरावतीला पाठविण्यात आले आहे.

अपघातांची मालिका
परतवाडा ते अकोटपर्यंत रस्ता चौपदरीकरणाच्या कामात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला, पन्नासावर अपघात झाले आहेत. सोमवारी सायंकाळी आॅटोरिक्षातील मुले फेकली गेल्याने बचावली.


Web Title: Filling the container's automobile; Eight serious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.