राज्यात कारागृहांत २५८५ अस्थायी पदांना मुदतवाढ; अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 05:26 PM2018-02-01T17:26:37+5:302018-02-01T17:28:24+5:30

राज्यात मध्यवर्ती, जिल्हा कारागृह, विशेष, महिला आणि खुले कारागृहात अस्थायी असलेल्या २५८५ पदांना शासनाने मुदतवाढ प्रदान केली आहे. यात अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश असून, यापैकी ८७ राजपत्रित, तर २४९८ अराजपत्रित आहे. त्यानुसार गृहविभागाने ३१ जानेवारी रोजी आदेश निर्गमित केले आहे.

Extension of 2585 temporary posts in jails in the state; Additional Director General of Police | राज्यात कारागृहांत २५८५ अस्थायी पदांना मुदतवाढ; अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश

राज्यात कारागृहांत २५८५ अस्थायी पदांना मुदतवाढ; अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश

Next

अमरावती : राज्यात मध्यवर्ती, जिल्हा कारागृह, विशेष, महिला आणि खुले कारागृहात अस्थायी असलेल्या २५८५ पदांना शासनाने मुदतवाढ प्रदान केली आहे. यात अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश असून, यापैकी ८७ राजपत्रित, तर २४९८ अराजपत्रित आहे. त्यानुसार गृहविभागाने ३१ जानेवारी रोजी आदेश निर्गमित केले आहे.
कारागृह विभागातील महानिरीक्षक कार्यालय ते त्यांच्या अधिपत्याखाली कारागृहातील मंजूर पदांचा सर्वंकष आढावा पूर्ण होऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने ४२१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधास शासननिर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ४२१६ पदांच्या या आकृतिबंधात ४ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकू ण १७३७ पदे अस्थायी निर्माण करण्यात आली आहेत. त्यानंतर सातत्याने अस्थायी पदे वाढतच गेली. त्यामुळे गृहविभागाने २५८५ अस्थायी पदांना १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मान्यता प्रदान केली आहे. या पदांसाठी लागणारा खर्च शासनाकडून मिळेल, असे गृहविभागाचे कार्यासन अधिकारी स.ग. ठेंगील यांनी स्पष्ट केले आहे.

कारागृहनिहाय पदांना मुदतवाढ
पुणे कारागृह महानिरीक्षक कार्यालय - ३८, कारागृह उपमहानिरीक्षणालय येरवडा- ७, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण येरवडा- १५, येरवडा मध्यवर्ती कारागृह - १६४, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह - ६७, सातारा जिल्हा कारागृह - ४६, सांगली जिल्हा कारागृह - ३८, सोलापूर जिल्हा कारागृह - ४९, कोल्हापूर जिल्हा कारागृह - १४, अहमदनगर जिल्हा कारागृह - ३३, विसापूर जिल्हा कारागृह - १६, खुले कारागृह येरवडा पुणे - १९, स्वतंत्रपूर खुली वसाहत आटपाडी - १३, कारागृह उपमहानिरिक्षक भायखळा मुंबई - १६, मध्यवर्ती कारागृह मुंबई - १०९, ठाणे मध्यवर्ती कारागृह - १०९, तळोजा मध्यवर्ती कारागृह नवी मुंबई - ३१२, कल्याण जिल्हा कारागृह - ८३, भायखळा जिल्हा कारागृह - २८, रत्नागिरी विशेष कारागृह - १२, अलिबाग जिल्हा कारागृह - ३२, सावंतवाडी जिल्हा कारागृह - ८, मुंबई जिल्हा महिला कारागृह - २७, जे.जे. समूह रुग्णालय मुंबई - १७, कारागृह उपमहानिरीक्षक औरंगाबाद - ११, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह - ८५, औरंगबाद मध्यवर्ती कारागृह - ८३, उस्मानाबाद जिल्हा कारागृह - ३२, नांदेड जिल्हा कारागृह - ३२, धुळे जिल्हा कारागृह - १९, बीड जिल्हा कारागृह - ३५, परभणी जिल्हा कारागृह - १, जळगाव जिल्हा कारागृह - ३८, किशोर सुधारालय नाशिक - ३१, पैठण खुले कारागृह - ४१, कारागृह उपमहानिरीक्षक नागपूर - ११, नागपूर मध्यवर्ती कारागृह - ८४, अमरावती मध्यवर्ती कारागृह - ८०, अकोला जिल्हा कारागृह - ३५, यवतमाळ जिल्हा कारागृह - ४०, चंद्रपूर जिल्हा कारागृह - ६१, वर्धा जिल्हा कारागृह - ३६, बुलडाणा जिल्हा कारागृह - ३३,  भंडारा जिल्हा कारागृह - ४१, खुले कारागृह मोर्शी - ५१, लातूर जिल्हा कारागृह - ९८, वाशिम जिल्हा कारागृह - ६०, नंदुरबार जिल्हा कारागृह - ७५, जालना जिल्हा कारागृह - ७५, गडचिरोली जिल्हा कारागृह - ५२ व सिंधदुर्ग जिल्हा कारागृह - ३७ अशा २५८५ पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: Extension of 2585 temporary posts in jails in the state; Additional Director General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.