वीजसेवा देणे बंद करणार, अभियंता संघटनेचा इशारा; वीज अभियंत्यांना मारहाणीचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 02:13 PM2017-12-07T14:13:44+5:302017-12-07T14:30:00+5:30

महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ल्याच्या घटना आता सामान्य म्हणाव्या एवढ्या संख्येने उजेडात येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास वीजसेवा देणे बंद करण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे.

Electricity shutdown, engineer organization alert; Violence against power engineers | वीजसेवा देणे बंद करणार, अभियंता संघटनेचा इशारा; वीज अभियंत्यांना मारहाणीचा निषेध

वीजसेवा देणे बंद करणार, अभियंता संघटनेचा इशारा; वीज अभियंत्यांना मारहाणीचा निषेध

Next

- वीरेंद्रकुमार जोगी 

अमरावती : महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ल्याच्या घटना आता सामान्य म्हणाव्या एवढ्या संख्येने उजेडात येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास वीजसेवा देणे बंद करण्याचा इशारा अभियंत्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, मागील महिनाभरात वीज कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या चार घटना अमरावती विभागात नोंदविण्यात आल्या आहेत. 

अचलपूर तालुक्यातील कांडली येथे बुधवारी अचलपूर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे यांना ग्रामपंचायत सदस्य गंगा धंदारे यांनी मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. यवतमाळ वीज परिमंडळ अंतर्गत मारेगाव येथे अवैध वीजजोडणी मोहिमेदरम्यान कनिष्ठ अभियंता सस्नेह वासेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले, तर २८ नोव्हेंबर रोजी पुसद येथे सहायक अभियंता सुदर्शन इवनाते यांना मारहाण करण्यात आली. यात इवनाते गंभीर जखमी झाले. घटनेच्या दिवसापासून ते आयसीयूमध्ये आहेत. यासोबतच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका वीज कर्मचाºयाला मारहाण केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. या घटनांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
दोषींवर कारवाईची मागणी
वीज अभियंत्यांना मारहाण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवावे, अशी मागणी महावितरणच्या अभियंत्यांच्या एसईए (सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन) या संघटनेने केली आहे. संघटना या विषयात लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहे. 

कोणतेही वैयक्तिक वैमनस्य नसताना अभियंत्यांना मारहाण केली जात आहे. अचलपूर परिमंडळात मारहाणीचा निषेध नोंदवून वीजसेवा न पुरविण्याचा निश्चय संघटनेने केला आहे.
- गजानन गोदे, सहसचिव, एसईए

Web Title: Electricity shutdown, engineer organization alert; Violence against power engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.