जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षण संघर्ष संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 09:57 PM2018-04-21T21:57:22+5:302018-04-21T21:57:22+5:30

Education struggle organization for old pension scheme aggressive | जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षण संघर्ष संघटना आक्रमक

जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षण संघर्ष संघटना आक्रमक

Next
ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी शिक्षण संघर्ष संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतुत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवण्याबाबतचा प्रस्ताव मान्य करून अनेक वेळा सहमतीसाठी वित्त विभागाला सादर करण्यात आला. परंतु, सदर प्रस्ताव वित्त विभागाने वेळोवेळी अमान्य करून परत पाठविला. ही बाब कर्मचाºयांवर अन्याय करणारी आहे. आंदोलनाचा पहिल्या टप्पा म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, वित्तमंत्री यांना निवेदन पाठवून जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत गळ घालण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये सकारात्मक विचार न झाल्यास १८ मे रोजी येथून मंत्रालयवर कुटुंबासह पायदळ मोर्चा काढण्याचा इशारा संगीता शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी ललित चौधरी, शरद तिरमारे, विकास दिवे, संजय बुरघाटे, निलम बोंडे, रीतेश खुळसाम, रहाटे, गजानन बुरघाटे, उमेश पाथरकर, नितीन तायडे, देवेन झेले, गजानन बुरघाटे, सुनील खोडे, नितीन ठाकरे, मदन खंडारे, राजाराम आखरे, संतोष बोरकर, राजेश टवले, विनोद राघोर्ते आदी उपस्थित होते.

Web Title: Education struggle organization for old pension scheme aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.