विदर्भात फुलू लागले पर्यावरणपूरक पळस वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:13 PM2019-03-18T14:13:43+5:302019-03-18T14:14:28+5:30

रंगासोबतच मधग्रंथीचे वरदान लाभलेल्या पळस वृक्षाला जैवविविधतेत अनन्य साधारण महत्त्व आहे. कोठेही सहज उपलब्ध होणाऱ्या पळस वृक्षाची मुळापासून तर फुलापर्यंतच्या भागाला आयुर्वेदात महत्त्व आहे. पळस वृक्षांमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे.

Eco-friendly Pulse tree in Vidharbha | विदर्भात फुलू लागले पर्यावरणपूरक पळस वृक्ष

विदर्भात फुलू लागले पर्यावरणपूरक पळस वृक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देअंगवृद्धीसाठी गुणकारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रंगासोबतच मधग्रंथीचे वरदान लाभलेल्या पळस वृक्षाला जैवविविधतेत अनन्य साधारण महत्त्व आहे. कोठेही सहज उपलब्ध होणाऱ्या पळस वृक्षाची मुळापासून तर फुलापर्यंतच्या भागाला आयुर्वेदात महत्त्व आहे. पळस वृक्षांमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे.
पळसाची फुले, शेंगा व त्यावर येणारे सर्व प्रकारचे कीटक, कीटकभक्षी पक्षी, बिया खाण्यासाठी येणारे पोपट व इतर पक्षी अशी ही शृंखलाच तयार होते. विविध प्रकारच्या कीटकांच्या वावरामुळे परागीकरणाची क्रिया वृद्धींगत होऊन किडीचे निर्मूलन याच पक्ष्यांच्या माध्यमातून घडून येते. हिंदू आणि बौद्ध संप्रदायांमध्ये पळसाला पवित्र वृक्ष मानले जाते. हिंदू धर्मात पळसाच्या तीन पानांपैकी मधले पान विष्णुचे, डावीकडील ब्रम्हा व उजवीकडील पानाला शिवाचे वास्तव्य दर्शविते. अशा पवित्र झाडाची चातुर्मासात आस्थेने पूजा केली जाते. वाळलेल्या फांद्यांचे तुकडे समिधा म्हणून होमहवनात वापरतात. यावरून याज्ञिक हे संस्कृत नाव दिले असावे. कवी कालिदासाने 'ऋतुसंहार' या काव्यात पळसाचे वर्णन केले आहे. या वृक्षांची अरण्ये म्हणजे देदिप्यमान अग्नीच होत.

अंगवृद्धीसाठी गुणकारी
आम्लपित्तावरदेखील पळस गुणकारी ठरतो. पोट दुखत असल्यास पळसाच्या लहान झाडाचा क्षार देतात. हत्तीपाय या विकारात पळसमूळ सरस तेलात मिसळून प्यायला देतात. लहान बालकांमध्ये आढळणाऱ्या अंगवृद्धीत सालीचा काढा करून देण्यात येतो. कृमिनाशक म्हणून वापरताना पलाश बीजातील दल काढून घ्यावा. बिया कोरड्या वाळवून त्याचा चुर्ण २० ग्रॅम प्रमाणात दिल्यास पोटावरील गोल चपटे कृमी नाहीसे होतात.

पळसाचा सामान्य उपयोग
पळसाची फुले कृमीनाशक, दाहप्रशमक
पळसाची लाल पिवळी फुले उकळून बनविलेला रंग खेळल्यास त्वचेचा विकार नाहीसा होतो. होळीपासून वाढणाºया कृमीपासून त्वचेचे रक्षण करून त्वचेची प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी हा धूळवडीचा सण असतो. पळसाची फुले कृमीनाशक व दाहशमक असतात. ताप, गोवर, काजण्या, बारीक पूरळ व घामोळ्या आदी विकारापासून पळसाची फुले रक्षण करतात.

शेताच्या धुºयावर पळस लावल्यास शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरेल. पळसातील विविध गुणांमुळे पक्षी, कीटक आकर्षित होतात. अशातच पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा नायनाट या पक्ष्यांद्वारे होण्यास मदत होते.
- डॉ. गणेश हेडावू, वनस्पतीशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय

Web Title: Eco-friendly Pulse tree in Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल