असदपूरच्या नाण्यांची पोलीस कस्टडी संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:29 AM2018-04-23T01:29:34+5:302018-04-23T01:29:34+5:30

राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रेतील चांदीच्या शिक्क्यांची पोलीस कस्टडी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संपुष्टात आली आहे. चांदीचे १४६ व इतर धातूंचे ६८ असे २१४ पुरातन शिक्के मागील १२ हिन्यांपासून आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत होते.

Due to police custody of coins of Asadpur | असदपूरच्या नाण्यांची पोलीस कस्टडी संपुष्टात

असदपूरच्या नाण्यांची पोलीस कस्टडी संपुष्टात

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : लखोट्यातून कोषागारात होणार रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रेतील चांदीच्या शिक्क्यांची पोलीस कस्टडी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संपुष्टात आली आहे. चांदीचे १४६ व इतर धातूंचे ६८ असे २१४ पुरातन शिक्के मागील १२ हिन्यांपासून आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत होते.
अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे श्रीकृष्ण केशवराव म्हाला यांच्या घरी खोदकाम चालू असताना वर्षभरापूर्वी हे २१४ शिक्के मिळाले होते. ३१ मार्च व २ एप्रिल २०१७ रोजी आढळलेले हे शिक्के तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी पुरी यांनी आसेगाव पोलीस ठाण्यात जमा केले होते. पुरातन मौल्यवान शिक्के, वस्तू मिळाल्यापासून १५ दिवसांत कोषागारात जमा करायला हवे होते. पण, तसे न करता आसेगाव पोलिसांनी ते स्वत:कडे ठेवून घेतले होते. यावर ‘लोकमत’ने ५ एप्रिलला वृत्त प्रकाशित केले होते. यात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हा कोषागारात ते ठेवण्याची व्यवस्था नाही. नागपूर येथील पुरातत्त्व विभागाला कळविले आहे. अद्याप निर्णय झालेला नाही, असे आसेगाव पोलिसांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अचलपूर उपविभागीय अधिकाºयांना यांना यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले आहे.
या पत्राची प्रत आसेगाव पोलिसांनाही आहे. नाण्यांचा मौल्यवान लखोटा तयार करून ही नाणी अचलपूर उपकोषागारात ठेवण्याचे निर्देश या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आता राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रेतील चांदीच्या शिक्क्क््यांसह इतर धातूच्या पुरातन शिक्क्क््यांची लखोट्यातून आसेगाव पोलिसांना अचलपूर उपकोषागारात रवानगी करावी लागणार आहे. त्यापूर्वी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
प्रत्येकी ११ ग्रॅमचा शिक्का
इंग्रजकालीन हे शिक्के भारतीय रुपयाच्या प्रारंभीच्या काळातील आहेत. हे शिक्के १८३३ ते १९४७ दरम्यान भारतात चलनात होते. असदपूर येथे सापडलेल्या या शिक्क्क््यांवर राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रा आहेत. यातील एका शिक्क्क््याचे वजन ११ ग्रॅम आहे.
यापूर्वीही आढळले शिक्के
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम सुरवाडा शिवारातील पांढरी उजाड या गावातील कामात मुगलकालीन शिक्के आढळले होते. यात पांढऱ्या धातूचे ६२ व पिवळ्या धातूचे दोन शिक्के होते. सन २०१४ मध्ये मिळालेले हे शिक्के पोलिसांनी लखोट्यातून उपकोषागारात ठेवले आहेत.

Web Title: Due to police custody of coins of Asadpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.