राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाची गंभीर स्थिती,१३४ तालुक्यांमध्ये भूजल निर्देशांक माघारला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 10:27 PM2018-10-20T22:27:31+5:302018-10-20T22:29:57+5:30

राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे.

Due to drought situation in 42 talukas of the state, ground water level coordinates turn out to be 134 talukas | राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाची गंभीर स्थिती,१३४ तालुक्यांमध्ये भूजल निर्देशांक माघारला

राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाची गंभीर स्थिती,१३४ तालुक्यांमध्ये भूजल निर्देशांक माघारला

Next

 - गजानन मोहोड 

अमरावती  - राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे. भुजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षण विहिरीच्या नोंदीची यापूर्वीच्या १० वर्षांच्या भूजलपातळीशी तुलना केली असता हे निरीक्षण नोंदविण्यात आले. यामध्ये सात तालुक्यात अतीगंभीर, ४२ तालुक्यात गंभीर तर  स्वरूपाचा तर ८५ तालुक्यात मध्यम स्वरुपात भुजलात कमी आलेली आहे.
नव्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यासोबत पिकांचे क्षेत्रिय सर्वेक्षण विचारात घेतल्या जाते. अनिवार्य निर्देशांकामुळे २०१ तालुक्यांत दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागल्यानंतर या सर्व तालुक्यात मृदु आर्द्रता निर्देशांकानुसार दुष्काळाची क्रमवारी निश्चित करण्यात आली. त्यानंतरच्या जलविषयक निर्देशांकांमध्ये राज्यातील सर्व जलसाठ्या संदर्भात पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे मुल्यमापन करण्यासाठी भूजल पातळी निर्देशांकाचा वापर करण्यात आला. त्यानुुसार राज्याच्या ३३ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यातील भूजल पातळीचे निरीक्षण विहिरीतील पातळीच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये हा धक्कादायक नित्कर्ष नोंदविण्यात आला. या ठिकाणी आता चाºयाची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगाराची वाढती मागणी व रोजगारासाठी लोकांचे स्थलांतर आदी विषयक माहिती सबंधित जिल्ह्यांकडून मागविण्यात येणार आहे

भूजल पातळी निर्देशांकानुसार बाधित तालुके
राज्यात ३५१ तालुक्यापैकी २१७ तालुक्यात स्थिती सामान्य आहे. मात्र, १३४ तालुक्यातील भुजलस्तर कमी झालेला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुके, अकोला २, अमरावती ३, औरंगाबाद ३, बीड ८, बुलडाणा ९, चंद्रपूर ४, धुळे १, जळगाव ३ जालना ४, लातूर ४, नागपूर ६, नांदेड ३, नंदूरबार ४, नाशिक ७, उसमानाबाद ८, परभनी २, पुणे ७, रायगड ११, रत्नागिरी ३, सांगली ७, सातार २, सिंधुदूर्ग १, सोलापूर ११, ठाणे/पालघर १३, वर्धा १व यवतमाळ जिल्ह्यातील १ तालुका भूजल पातळी निर्देशांकात माघारला आहे.

Web Title: Due to drought situation in 42 talukas of the state, ground water level coordinates turn out to be 134 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.