वादळामुळे वृक्ष कोसळल्याने दर्यापूर-अमरावती मार्ग तीन तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:41 AM2019-06-09T01:41:01+5:302019-06-09T01:41:54+5:30

धामोरी-मदलापूरनजीक वादळी पाऊस झाल्याने वादळामुळे दर्यापूर-अमरावती मार्गावर धामोरीनजीक आठ ते दहा झाडे मुख्य महामार्गावर कोसळली. यामुळे मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने दोन्ही बाजूला हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Due to the collapse of tree due to the storm, the Darayapur-Amravati route closed for three hours | वादळामुळे वृक्ष कोसळल्याने दर्यापूर-अमरावती मार्ग तीन तास बंद

वादळामुळे वृक्ष कोसळल्याने दर्यापूर-अमरावती मार्ग तीन तास बंद

googlenewsNext
ठळक मुद्देवाहनांच्या रांगा : धामोरी-मधलापूरनजीक आठ ते दहा वृक्ष जमीनदोस्त

अमरावती : धामोरी-मदलापूरनजीक वादळी पाऊस झाल्याने वादळामुळे दर्यापूर-अमरावती मार्गावर धामोरीनजीक आठ ते दहा झाडे मुख्य महामार्गावर कोसळली. यामुळे मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. मुख्य रस्त्यावर झाडे पडल्याने दोन्ही बाजूला हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ती झाडे केव्हा हटविणार, याची वाहनधारकांना प्रतिक्षा लागली होती. यासंदर्भाची माहिती नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांना दिली. परंतु रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने या ठिकाणचा कंत्राटदाराचा जेसीबी घटनास्थळावर तातडीने आणण्यात आला. मात्र तीन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाहतूक पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले होते. वादळ जोरात असल्याने नागरिकांमध्ये चांगलीच घबराहट निर्माण झाली होती. मात्र, यामध्ये कुठलीही मनुष्यहानी झाली नसल्याची माहिती आहे.

वादळ, विजेच्या कडकडाटासह बरसला पाऊस
तळेगाव दशासर : धामणगाव तालुक्यातील तळेगाव परिसरात दुपारी ४ वाजता अचानक मेघ दाटून आले. वादळासह विजांचा कडकडाट झाला नि मृगधारा बरसल्या. तळेगाव परिसरात सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान सुसाट वाऱ्यामुळे उर्दू शाळेच्या आवारातील दोन कडूनिंबाचे वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने जीवित हानी टळली. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा बाधित झाला. परिणामी नागरिकांची अंधारात फरफट होत आहे.

Web Title: Due to the collapse of tree due to the storm, the Darayapur-Amravati route closed for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.