जिल्हा मार्ग शंभर टक्के खड्डेमुक्त, एमडीआरचे ९२ टक्के रस्ते दुरुस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 06:46 PM2017-12-16T18:46:28+5:302017-12-16T18:46:34+5:30

जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत मुख्य राज्य मार्ग व राज्य मार्ग १०० टक्के  खड्डेमुक्त करण्यात आले, तर  प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) चे ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा अहवाल अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. 

District Road Repairing 96% of Khadse Mukta, MDR Road | जिल्हा मार्ग शंभर टक्के खड्डेमुक्त, एमडीआरचे ९२ टक्के रस्ते दुरुस्त

जिल्हा मार्ग शंभर टक्के खड्डेमुक्त, एमडीआरचे ९२ टक्के रस्ते दुरुस्त

Next

अमरावती :  जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत मुख्य राज्य मार्ग व राज्य मार्ग १०० टक्के  खड्डेमुक्त करण्यात आले, तर  प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) चे ९२ टक्के रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा अहवाल अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविला आहे. 
जिल्ह्यात ७० कोटींच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.   जिल्ह्यात १८६७.७४ किमी  मुख्य जिल्हा मार्ग व राज्य मार्ग आहेत, तर १६०३.५४ किमीचे  प्रमुख जिल्हा मार्ग आहे.  ज्या रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यामध्ये ५५६.६ किमीचे रस्ते हे मुख्य जिल्हा मार्ग व  राज्यमार्गावर  खड्डे पडले होते. ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून बुजविण्यात आले असून, हे रस्ते शंभर टक्के खड्डेमुक्त करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे, तर ४६९.९० किमी प्रमुख जिल्हा मार्ग  (एमडीआर)  रस्त्यावर  खड्डे पडले होते. त्यापैकी ४३२.६१ किमीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले आहे. याची टक्केवारी ९२.०६ टक्के एवढी आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीविशेष प्रकल्प विभाग अमरावती तसेच दर्यापूर, अचलपूर आदी डिव्हिजनमधील रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये ७० कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. काही मार्गांवर खड्डे शंभर टक्के भरण्यात आले आहेत. उर्वरित कामे सुरू आहेत. 
विवेक साळवे, अधीक्षक अभियंता, अमरावती

Web Title: District Road Repairing 96% of Khadse Mukta, MDR Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.