ठळक मुद्देशासनाकडे दाद मागू : संजय गांधीनगरवासीयांच्या भावना, केंद्रीय मंत्र्यांंकडे धाव घेणारनितीन गडकरी यांना संजय गांधीनगरवासी आज भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली. त्यासाठी आमच्या आई-वडिलांनी अपार कष्ट घेतले. त्यांच्या आठवणींचा ठेवा या परिसरात आहेत. आम्ही येथे खेळलो, वावरलो, लहानाचे मोठे झालो. त्यामुळे मरण पत्करू, पण हा परिसर, घरे सोडणार नाही, अशा भावना संजय गांधीनगर क्रमांक २ येथील नागरिकांच्या आहेत.
संजय गांधीनगरवासीयांना घरे हटविण्यासाठी सात दिवसांचा अवधी वनविभागाने दिला. बडनेरा मार्गावरील जुन्या बायपासलगत राखीव वनजमिनीवर सन १९८२ पासूनचे अतिक्रमण संजय गांधीनगर क्रमांक-२ म्हणून नावारूपास आले. गरीब, सामान्य, कामगार, मोलमुजरी करून उपजीविका करणारी ही लोकवस्ती आहे. रमाई आवास योजनेतून कुडामातीच्या झोपड्यांनी आता पक्क््या घराचे स्वरूप घेतले. आता शासनादेशानुसार वनजमिनींवर अतिक्रमण मोकळे करण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. वडाळी वनक्षेत्र अधिकारी कार्यालयाने गुरुवार, ९ नोव्हेंबरला वनजमिनीची नोंद असलेल्या संजय गांधीनगर क्र. २ येथील २७९ रहिवाशांना नोटीस बजावून सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. वनविभागाची नोटीस हाती पडताच स्थानिक रहिवासी हादरून गेले. आयुष्य जेमतेम स्थिरावले असताना पुन्हा फरपट येणार का, अशी विचारणा ते एकमेकांना करताना आढळले. मुला-बाळांचे शिक्षण, भविष्याचे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे संजय गांधीनगरवासी कैफीयत मांडणार आहेत.
संजय गांधीनगरात या आहेत सुविधा
राखीव वनजमीन अशी नोंद असलेल्या संजय गांधीनगरात महापालिका, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी यंत्रणेने विविध सोईसुविधा प्रदान केल्या आहेत. पाच समाजमंदिर‘, एक हनुमान व महादेव मंदिर, चार बालवाड्या, चार अंगणवाड्या, दोन वाचनालये, एक व्यायामशाळा आणि एक उद्यान साकारले आहे.
काय म्हणतात नागरिक
संजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.
- उत्तमराव धंदर

संजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.
- उत्तमराव धंदर

१९८२ पूर्वीपासून येथेच वास्तव्यास आहे. पोटाला चिमटा देत पै-पै जमा केला. कसे तरी घर बांधून मुला-बाळांचा सांभाळ केला. नातवंडे झालीत. आता प्रशासन म्हणते, घर तोडा. त्यापेक्षा मरण आलेले बरे.
- कमलाबाई डहाके

प्रशासनाने संजय गांधी नगरवासीयांना पायाभूत आणि मूलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत. मोलमजुरी करून घर साकारले. मुला-बाळांना शिकवून त्यांनी उंच भरारी घ्यावी, हे स्वप्न रंगवित असताना आता घर राहणार नाही अशी स्थिती उद्भवली आहे.
- शीला भडके

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.