श्वानभक्षण करणाºयांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:18 AM2017-08-19T00:18:23+5:302017-08-19T00:18:47+5:30

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहात घडलेल्या श्वान भक्षण प्रकरणात सखोल चौकशी करून परप्रांतीय विद्यार्थ्यांना अटक करा,.....

Detect botanists | श्वानभक्षण करणाºयांना अटक करा

श्वानभक्षण करणाºयांना अटक करा

googlenewsNext
ठळक मुद्देइशारा : भाजपच्या ओबीसी सेलची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहात घडलेल्या श्वान भक्षण प्रकरणात सखोल चौकशी करून परप्रांतीय विद्यार्थ्यांना अटक करा, अशी मागणी भाजपा (ओबीसी) मोर्चा विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनातून शुक्रवारी केली.
जिल्हाधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चौकशीसंदर्भात आश्वासन दिले. हव्याप्र मंडळात शारीरिक शिक्षणाचे धडे घेणाºया परप्रांतीय विद्यार्थ्यांनी श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वानभक्षण केले. श्रीनाथवाडीतील श्वानाला क्रूरतेने कापून खाल्ल्याची तक्रार राजापेठ पोलिसात करण्यात आली आहे. हा निर्दयी प्रकार सामाजिक भावना दुखावणारा आहे. पूजनीय असणाºया श्वानाला कापून खाल्ल्याचा गंभीर प्रकार घडला असतानाही अद्याप दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. या धार्मीक व सामाजिक गुन्ह्याबाबत योग्य दखल घेऊन संबंधित दोषी परप्रांतीय विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह अ‍ॅड.रोशन धांदे, प्रवीण देवळे, सचिन पिंजरकर, प्रशांत इंगोले, रोशन चाफले, गजानन इंगोले, योगेश उपाध्याय, गोपाल देशमुख, संतोष मानकर आदी पदाधिकाºयांनी केली आहे. या निवेदनाला जिल्हाधिकाºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्वासन विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांना दिले.

Web Title: Detect botanists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.