शनिवारी ‘डिलिव्हरी; सोमवारी १.९४ कोटी बहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:44 PM2018-05-21T23:44:03+5:302018-05-21T23:45:09+5:30

देयकाची संचिका (फाईल) डाक किंवा लिपिकाकरवी न फिरविता हातोहात फिरवून केवळ दोन दिवसांत १.९४ कोटी रुपयांचे देयक संबंधित कंपनीला प्रदान करण्याचा महापालिकेतील प्रताप सोमवारी उघड झाला.

Delivery 'on Saturdays; Reinstate 1.9 crore 4 million on Monday | शनिवारी ‘डिलिव्हरी; सोमवारी १.९४ कोटी बहाल

शनिवारी ‘डिलिव्हरी; सोमवारी १.९४ कोटी बहाल

Next
ठळक मुद्देअधीक्षक चौहान संशयाच्या भोवऱ्यात : महापालिका प्रशासनाची अशीही गतिमानता

प्रदीप भाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देयकाची संचिका (फाईल) डाक किंवा लिपिकाकरवी न फिरविता हातोहात फिरवून केवळ दोन दिवसांत १.९४ कोटी रुपयांचे देयक संबंधित कंपनीला प्रदान करण्याचा महापालिकेतील प्रताप सोमवारी उघड झाला.
२ कोटी ४ लाख रुपये किमतीचे ‘मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन’ रविवारी महापालिकेत दाखल झाले. ते संपूर्ण सुसज्ज वाहन येण्यापूर्वीच त्याचे कोट्यवधीचे देयक देण्यात आल्याने अग्निशमन अधीक्षकांसह संबंधित अन्य संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अग्निशमन विभागाला वाहन पुरविणाऱ्या कंपनीला २२ डिसेंबर २०१७ ला १.९४ कोटी रुपये दिले गेले. प्रत्यक्षात वाहन पुरवठा मात्र २० मे २०१८ रोजी करण्यात आला. निविदेतील स्पेसिफिकेशननुसार वाहनाचा पुरवठा झाला नसताना संपूर्ण रक्कम अवघ्या दोन दिवसांत दिल्याने कमिशनखोरीच्या आरोपाला दुजोरा मिळाला आहे.
हातोहात फिरविली फाईल
संबंधित कंपनीने पुरवठा केलेले वाहन निविदेमधील तांत्रिक अटी-शर्ती पूर्ण करणारे नसतानाही विभागप्रमुखांनी अगदी दुसºयाच दिवशी देयक प्रस्तावित केल्याने अग्निशमन अधीक्षकांसह अन्य संबंधित संशयाच्या भोवºयात आले आहेत. महापालिकेत ‘दलाल’ म्हणून सर्वश्रुत असलेल्या ‘एसडी’ने ही फाइल हातोहात फिरविली. प्रत्येकाला ठरलेला टक्क्का मिळाला आणि रेकॉर्डब्रेक वेळात १ कोटी ९४ लाख ६ हजार ३१५ रुपये निधी एंटरप्रायजेसला बहाल करण्यात आले. पुरवठा आदेशाच्या तब्ब्ल सात महिन्यानंतर महापालिकेत हे वाहन पोहोचले आहे.
अन्य कंत्राटदार वा एजंसीच्या बिलाला सहा-आठ महिने लागत असताना १.९४ कोटी रुपये अवघ्या दोन दिवसांत दिले गेले.
अवघ्या दोन दिवसात देयक काढण्याची ही गतिमानता अन्य बाबतीत प्रशासनाची दाखविली असती, तर अनेक प्रश्न निकाली निघाले असते, अशी तिखट प्रतिक्रिया महापालिकेत यानिमित्ताने उमटली आहे. यात लाखांची बिदागी संबंधितांना पोहोचल्याचा गंभीर आरोप आहे.
वाहन तपासणी कुणी केली?
१६ डिसेंबर २०१७ रोज शनिवार रात्री हे वाहन अग्निशमन विभागास मिळाले, अशी माहिती अधीक्षकांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी रविवार होता. २ कोटी ४ लाख रुपये किमतीचे वाहन हस्तांतरित करून घेत असताना ते वाहन स्पेसिफिकेशननुसार आहे किंवा कसे, हे पाहणे अनिवार्य होते. अग्निशमन अधीक्षक तांत्रिक तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे अधीक्षकांनी त्या वाहनाची तपासणी न करता मिळाल्याची नोंद घेतली. एवढेच काय तर योग्यरीत्या पुरवठा झाल्याने देयकही प्रस्तावित केले. त्यामुळे वाहनाची संपूर्ण तपासणी न करता लगेचच दुसऱ्या दिवशी देयके प्रस्तावित करणारे अधीक्षक चव्हाण यांनी या अनियमितेत की-रोल वठविल्याचे स्पष्ट आहे.
वाहन मल्टियूटिलिटी
अग्निशमन यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी महापालिकेने ‘मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला. निधी एंटरप्रायजेसला १७ आॅक्टोबर २०१७ ला पुरवठा आदेश देण्यात आले. २ कोटी ४ लाख २७ हजार ७०० रुपये किंमत ठरली. निधी एंटरप्रायजेसने १६ डिसेंबर २०१७ रोजी वाहन पुरवठा केल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे आहे.
१८ डिसेंबरपासून फायलीचा प्रवास
निधी एंटरप्रायजेसकडून हे वाहन १६ डिसेंबरला आल्यानंतर १८ डिसेंबर रोजीच अधीक्षक भारतसिंह चौहान यांनी देयक प्रस्तावित केले. त्यावर मुख्य लेखापरीक्षक व मुख्य लेखाधिकाऱ्यांनी १८ ला, तर उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी १९ डिसेंबर रोजी स्वाक्षरी केली. २२ डिसेंबर रोजी आयकर व अन्य कर कपात करुन १.९४ कोटी रुपये अदा करण्यात आले. फाईल हातोहात फिरविण्यात आली.

Web Title: Delivery 'on Saturdays; Reinstate 1.9 crore 4 million on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.