सीईओंच्या आदेशाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:25 AM2018-02-20T00:25:58+5:302018-02-20T00:26:19+5:30

झेडपील प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांची प्रक्रिया होऊ न वर्ष लोटून गेल्यावरही अनेक विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना आधीच्या कार्यातून कार्यमुक्त केलेले नाही.

Defy CEO orders | सीईओंच्या आदेशाची अवहेलना

सीईओंच्या आदेशाची अवहेलना

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद : कर्मचारी युनियनचा आरोप, कार्यवाहीची मागणी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : झेडपील प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांची प्रक्रिया होऊ न वर्ष लोटून गेल्यावरही अनेक विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना आधीच्या कार्यातून कार्यमुक्त केलेले नाही. हा प्रकार मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविणारा आहे.
याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी युनिनयचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्या नेतृत्वात सीईओ यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. तक्रारीनुसार मे २०१७ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. शासननिर्णय २०१४ च्या धोरणानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली असून, कर्मचाºयांना बदली आदेशसुद्धा देण्यात आले.मात्र एक वर्ष होऊनही विभागप्रमुखांनी या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. परिणामी कार्यमुक्तच केले नाही. विशेष म्हणजे बदली झाल्यानंतर लगेच बदली झालेल्या कर्मचाºयांनी त्या ठिकाणी रूजू व्हावे, असे मुख्यकार्यपालन अधिकारी यांचेच आदेश आहेत. मात्र, या आदेशाला न जुमानता विभागप्रमुखांनी अवहेलना केल्याचा आरोप पंकज गुल्हाने यांनी केला आहे. अशा कर्मचाºयांची वेतन देयके देण्यात येऊ नये, अशा सूचना असताना त्यांना हा लाभ देण्यात येत आहे. बदली झालेल्या कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे पंकज गुल्हाने, संजय खारकर, समीर चौधरी, प्रशांत धर्माळे, श्रीनिवास उदापुरे, योगेंद्र देशमुख, गजानन कोरडे, संजय राठी व पदाधिकाºयांनी केली आहे.

Web Title: Defy CEO orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.