१३ तालुक्यांच्या भूजलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:20 PM2018-03-21T22:20:34+5:302018-03-21T22:20:34+5:30

सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती १३ तालुक्यांत सरासरी १.६४ मीटरने पाण्याची पातळी खालावल्याचा अहवाल दिला आहे.

Decrease in ground water in 13 talukas | १३ तालुक्यांच्या भूजलात घट

१३ तालुक्यांच्या भूजलात घट

Next
ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाची माहिती : ३०१ गावांना कोरड, ५६१ उपाययोजना

आॅनलाईन लोकमत
अमरावती : सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती १३ तालुक्यांत सरासरी १.६४ मीटरने पाण्याची पातळी खालावल्याचा अहवाल दिला आहे. पाच वर्षांच्या भूजल पातळीच्या तुलनात्मक नोंदीनंतरचे हे निरीक्षण आहे. त्यामुळे एप्रिल ते जूनदरम्यान ३०१ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेद्वारा ५६१ उपाययोजना प्रस्तावित केल्यात, यावर ४.०२ कोटींच्या निधींची गरज आहे.
पावसाचे १२० दिवसात सरासरी ८१४ मिमीची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ५४८ मिमी पाऊस पडला, ही ६६ टक्केवारी आहे. केवळ ४५ दिवस पावसाचे राहिल्याने भुगर्भाचे पुर्नभरण झालेले नाही. परिणामी सप्टेंबर अखेरपासून भूजलात कमी आली. डिसेंबरनंतर रबीच्या हंगामासाठी पाण्याचा उफसा होत आहे तसेच त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा १४ तालुक्यांतील १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतरच जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत भूजल पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. मागील पाच वर्षाची जानेवारीअखेर भूजल पातळी ६.७३ मीटर होती, त्या तुलनेत यंदा ८.३७ मीटर आहे. म्हणजे जिल्ह्याच्या पाणीपातळीत उणे १.६४ मीटरने कमी आलेली आहे. यंदा भुजलात सर्वात कमी अचलपूर तालुक्यात आहे. या तालुक्यात उणे ७. १८ मीटरने पाणीपातळी कमी झालेली असल्याचे निरीक्षण नोंदविले.
भूजलात गतीने घट झाल्यामुळे पाण्याचे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प वगळता तीन मध्यम प्रकल्पांत ५१.५२ टक्के, तर ४६ लघुप्रकल्पांत फक्त २१.५६ टक्के साठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहीत धरता या प्रकल्पांना मार्चच्या प्रारंभीच कोरड पडली असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असललेया शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत ५१.४३ टक्के, पूर्णा प्रकल्पात ५७.३९ तर चंद्रभागा प्रकल्पात पूर्ण संचय पातळीच्या ४६.५७ टक्के साठा शिल्लक आहे. या प्रकल्पात असलेला मृत साठा व दररोज होणारे बाष्पीभवन लक्षात घेता, या साठ्यामध्येदेखील झपाट्याने कमी येत आहे.
पाणीटंचाई निवारणार्थ ५६१ उपाययोजनांची मात्रा
यंदाच्या उन्हाळ्यात ३०१ गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे यासाठी जिल्हाप्रशासनाने ५६१ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये २०० विहिरींचे खोलीकरण व ९९ खासगी विहिरीमचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. ३९ टँकरने पाणी पुरवठा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. ६७ गावांमध्ये नळ योजनांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तीण तात्पुर्त्या पूरक नळ योजना, १५ विंधन विहिरींची दुरूस्ती व १३४ विंधन विहिरींची दुरूस्ती केली जाईल.
लघु, मध्यम प्रकल्पांनी गाठला तळ
मध्यम प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. यामध्ये ४६ पैकी १५ प्रकल्पात १० सद्यस्थितीत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये मालेगाव १८ टक्के, घाटखेड २४, बस्तापूर ३९, केकतपूर ४७, टोंगलफोडी १४, मालखेड १६, भिवापूर २४, दाभेरी २१, त्रिवेणी ४७, शेकदरी ४७,पंढरी २७, वाई ३९, सातनूर ४३,जामगाव २५,नागठाणा ३३, जमालपूर ३६, खारी ३२, साद्राबाडी २१, गावलानडोह २१, सावलीखेडा १६, गंडगा १८, रंभाड २०, बोबदो १७, लवादा १३, मारइ १५, जभेंरी १२, ज्युटपाणी १८,नांदूरी १५ टक्के साठा उपलब्ध आहे. लघु प्रकल्पात खतिजापूर, गोंडवाघोली, पिंपळगाव, टाकळी, सूर्यगंगा, दहीगाव, जळका, अमदोरी, दाभेरी, बेलसावंगी, बेबदा व मोगर्दा प्रकल्पात सद्यस्थितीत १० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.

Web Title: Decrease in ground water in 13 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.