The death of youth in Chikhaldara due to selfy | सेल्फीच्या नादात चिखलदऱ्याच्या भीमकुंडात कोसळून युवकाचा मृत्यू
सेल्फीच्या नादात चिखलदऱ्याच्या भीमकुंडात कोसळून युवकाचा मृत्यू

ठळक मुद्देमित्रांसह आला होता पर्यटनाला

लोकमत न्यूज नेटवर्क 
 अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध भीमकुंड पॉर्इंटवर फिरायला आलेल्या युवकाचा सेल्फीच्या नादात मोबाईल पडला. तो पकडण्याच्या प्रयत्नात तो पाय घसरुन हजारो फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. राहुल भीमराव पाखरे (२५, रा. चिंचोना, ता. अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे.
चिखलदऱ्यातील साहसी युवकांनी दरीत उतरून रात्री ७.३० वाजता त्याचा मृतदेह बाहेर काढला. मृताचा भाऊ संजय भीमराव पाखरे तसेच मित्र अविनाश पांडुरंग काटोले, आदेश देवेंद्र पाखरे, विनोद भीमराव पांगर, शुभम शेषराव गावंडे या मित्रांसह गुरुवारी दुपारी २ वाजता चिखलदरा येथे फिरण्यासाठी आले. त्यांनी येथील एका नातेवाइकाच्या घरी भेट दिल्यावर काही पॉर्इंट बघितले. भीमकुंड येथे आल्यानंतर दरीच्या काठावर फोटो काढले. यावेळी मोबाइल पडल्याने पाय घसरून राहुल दरीत कोसळला.

रेस्क्यू टीमने काढले बाहेर
मृतदेह बाहेर काढताना रेस्क्यू टीमला दोन वेळा दरीत उतरावे लागले. अंधारात हिंस्त्र प्राणी मृतदेहाचे लचके तोडू शकतात, ही शक्यता गृहीत धरून नगरसेवक अरुण तायडे यांच्या नेतृत्वात तेजस नेवास्कर, गजानन शनवारे, नज्जू कासदेकर, नाझीम शेख, भोला कासदेकरसह सहकाऱ्यांनी मृतदेह काढण्याची लगबग केली.


Web Title: The death of youth in Chikhaldara due to selfy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.