चारचाकीचे चाक पोटावरून गेल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:44 AM2018-12-10T00:44:02+5:302018-12-10T00:44:35+5:30

सेंट्रिंगच्या लाकडांनी भरलेले चारचाकी वाहन मागे घेताना चाक पोटावरून गेल्याने सात वर्षीय बालकांचा करुण अंत झाला. दयान मुल्ला तौफी मुल्ला (७, रा. सुफीनगर) असे मृताचे नाव आहे. ही हृदयदायक घटना रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वलगाव स्थित सुफीनगरात घडली.

The death of the child after going through the wheel of Charchaki's wheel | चारचाकीचे चाक पोटावरून गेल्याने बालकाचा मृत्यू

चारचाकीचे चाक पोटावरून गेल्याने बालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवाहनचालकाला अटक : सुफीनगरातील हृदयद्रावक घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेंट्रिंगच्या लाकडांनी भरलेले चारचाकी वाहन मागे घेताना चाक पोटावरून गेल्याने सात वर्षीय बालकांचा करुण अंत झाला. दयान मुल्ला तौफी मुल्ला (७, रा. सुफीनगर) असे मृताचे नाव आहे. ही हृदयदायक घटना रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास वलगाव स्थित सुफीनगरात घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, वलगावात शोककळा पसरली आहे.
सुफीनगरातील रहिवासी दयान मुल्ला तौफी मुल्ला हा सात वर्षीय बालक वलगावातील एका शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. रविवारी सुट्टी असल्यामुळे तो संवगड्यांसोबत घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. यावेळी परिसरातील बांधकाम स्थळावरून चालक आपल्याकडील पीकअप (क्रमांक एमएच ०४ ईबी-१९९४) मागे (रिवर्स) नेत होता. यादरम्यान रस्त्यावर खेळणाºया दयानकडे चालकाचे दुर्लक्ष झाले व धडकेने रस्त्यावरून कोसळलेल्या दयानच्या पोटावरून वाहनाचे मागील चाक गेले. अपघातानंतर मात्र दयान स्वत: उठून आपल्या घराच्या दारापर्यंत गेला आणि ‘अम्मी’ला आवाज देत खाली कोसळला. त्याच्या आईने बाहेर धाव घेतली. अपघात घडल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी दयानला तात्काळ वलगावातील रुग्णालयात नेले. तेथून त्याला अमरावतीच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर इर्विन रुग्णालयात आणले गेले. तेथे डॉक्टरांनी दयानला मृत घोषित केले. या हृदयदायक घटनेमुळे वलगावात खळबळ उडाली होती. अपघातानंतर वाहनचालकाने थेट वलगाव पोलीस ठाणे गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलिसांनी वाहनचालक मोहम्मद इलियास शेख मजीद (५२, रा. सौदागरपुरा) याला अटक करून वाहन जप्त केले. दयानचे वडील बांधकामावर मजूर असून, आई, वडील, मोठा भाऊ व एक बहीण असे त्याचे कुटुंब आहे. दयानच्या मृतदेहाचे रविवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. वलगाव पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, त्याला अटक केली आहे.

Web Title: The death of the child after going through the wheel of Charchaki's wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात