निपाणे, नैतामविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:26 PM2018-08-17T22:26:26+5:302018-08-17T22:26:49+5:30

डेंग्यूने दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे महापालिका आयुक्त संजय निपाणे आणि आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार युवा सेनेने शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्यासह १४ जणांच्या सह्या तक्रारीवर आहेत.

Dealing with injustice, report crime against humanity | निपाणे, नैतामविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

निपाणे, नैतामविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

Next
ठळक मुद्देयुवा सेना : कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डेंग्यूने दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे महापालिका आयुक्त संजय निपाणे आणि आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार युवा सेनेने शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्यासह १४ जणांच्या सह्या तक्रारीवर आहेत.
पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यात दिरंगाई केल्यास दोन दिवसांनी महापालिका आयुक्तांच्या कक्षात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या तक्रारीतूनच देण्यात आला आहे. आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी कर्तव्यात हयगय केल्याच्या अनुषंगाने महापालिका अधिनियमांतील तरतुदींनुसार चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर नारेबाजी करण्यात आली. तक्रारकर्त्यांच्या संतप्त भावना बघून ठाणेदार दिलीप पाटील यांनी महापालिका आयुक्तांनाही भ्रमणध्वनीहून संपर्क साधला. पाटील यांनी स्थिती संवेदनशीलपणे हाताळली.

युवा सेनेची तक्रार प्राप्त झाली. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहू. एक पत्र महापालिका आयुक्तांनासुद्धा पाठविले जाईल.
- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.

Web Title: Dealing with injustice, report crime against humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.