नातेवाईकांची क्रुरता; घरात डांबून १६ वर्षीय मुलाला दिले गरम झाऱ्याने चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 09:12 PM2019-03-24T21:12:16+5:302019-03-24T21:12:54+5:30

बडनेरा येथील घटना : आईची पोलिसांत तक्रार, पाच आरोपींना अटक

Cruality of the relatives; Hot spring to a 16-year-old boy in a house | नातेवाईकांची क्रुरता; घरात डांबून १६ वर्षीय मुलाला दिले गरम झाऱ्याने चटके

नातेवाईकांची क्रुरता; घरात डांबून १६ वर्षीय मुलाला दिले गरम झाऱ्याने चटके

Next

बडनेरा (अमरावती) : खोलीत डांबून एका सोळा वर्षीय मुलाला जबरदस्तीने दारू पाजून त्याला गरम झाºयाने चटके दिल्याची घटना बडनेरा येथे घडली. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शनिवार उशिरा रात्री बडनेरा पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवून अटक केली.


प्रशांत शेषराव मढाईत (४४), अरूण मेश्राम (५०), कैलास राऊत (६२), ऋषिकेश (किराणा दुकानदार, रार्व रा. बडनेरा) व रमेश बागडे (४२, रा. कारंजा लाड) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेची तक्रार वंदना राजेश ऊके (५०, रा. ऊमरेड, जि. नागपूर) यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार माझा मुलगा हिमांशू राजेश ऊके याला आरोपींनी घरात डांबून दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर गरम झाºयाचे चटके दिले. ही घटना होळीच्या रात्री घडली. या घटनेची तक्रार शनिवारला देण्यात आली. बडनेरा पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४९, ३२८, ३२४, ३२३, ३३६, ३३७, ३६२, ३५२, ५०६ सहकलम बालकांची काळजी सुधारणा अधिनियम ७७ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 


पीडित मुलाच्या मांडीवर तसेच शरीराच्या इतरही भागांवर गंभीर चटके दिले. सदर घटना गांधी विद्यालयाजवळील कैलास राऊत याच्या घरी घडल्याचे तक्रारकर्ती आईचे म्हणणे आहे. या घटनेत दुसºया एका मुलालासुद्धा अशाच प्रकारे चटके दिल्याची चर्चा आहे. मात्र त्याने नातेवाईकांनी याची वाच्यता पोलीस ठाण्यात केलेली नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी झारा जप्त केला आहे. सर्व आरोपींना रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

चटके देणाऱ्यांमध्ये शिक्षकाचा समावेश
पीडित मुलाला खोलीत डांबून त्याला गरम झाºयाचे चटके देण्यात आले. यातील पाच आरोपींपैकी एक शिक्षक आहे. शिक्षकाला असे कृत्य करणे शोभले का, असा सवाल या अमानुष कृत्यानंतर नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

 

चटके देण्याच्या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. सखोल चौकशी केली जात आहे. 
- शरद कुळकर्णी,
पोलीस निरीक्षक, बडनेरा

Web Title: Cruality of the relatives; Hot spring to a 16-year-old boy in a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.