निर्धोक वाहतुकीसाठी 'सीपी इन अ‍ॅक्शन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:25 PM2017-10-08T23:25:04+5:302017-10-08T23:25:37+5:30

शहरातील वर्दळीच्या मार्गावरील अतिक्रमित हातगाड्या व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी रात्री बडगा उगारला.

'CP in Action' for poor transport | निर्धोक वाहतुकीसाठी 'सीपी इन अ‍ॅक्शन'

निर्धोक वाहतुकीसाठी 'सीपी इन अ‍ॅक्शन'

Next
ठळक मुद्देहातगाड्यांवर कारवाई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया दुचाकीही 'टार्गेट'

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील वर्दळीच्या मार्गावरील अतिक्रमित हातगाड्या व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शनिवारी रात्री बडगा उगारला. शहरातील अरुंद आणि अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यासाठी सीपींनी 'अ‍ॅक्शन'घेतली आहे. स्वत: रस्त्यावर उतरून बेबंद वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
अंबानगरीतील वाढती लोकसंख्या व वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अरुंद रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढल्याने अमरावतीकर हैराण झाले आहेत. सीपींनी वाहतूक सुरक्षिततेसाठी आता कंबर कसली आहे.
रस्ते मोकळे करून देण्यासाठी सीपी दत्तात्रय मंडलिक प्रयत्नरत आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गुन्हेगारीला आळा बसण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी नियोजनबद्ध कामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्तांनी शनिवारी रात्री शहरातील विविध मार्गाने फेरफटका मारून वाहतुकीस बाधा ठरणाºया हातगाड्या व वाहनांवर कारवाई केली. ते रविवारी रात्री इर्विनकडून मालवीय चौकाकडे जात असताना त्यांना मर्च्युरी पाईन्टजवळ एक मॉडीफाय केलेल्या चारचाकी वाहन आढळून आले. त्या वाहनाचा मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी वापर होत असल्याचे आढळून आले. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त करून चालक अथर हुसेन रहेमत हुसेन (३३,रा.पाटीपुरा) याच्याविरुध्द भादंविच्या कलम २८३, २८५ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर सीपींनी चित्रा चौक, टांगा पडाव, अंबादेवी रोड, गांधी चौक, रविनगर, साईनगर मार्गावरील वाहतुकीची पाहणी करून नियमबाह्य हातगाड्या व वाहनांवर कारवाई केली. वाहने व हातगाड्या ठाण्यात जमा करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. सीपींच्या नाईट राऊंडमुळे गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मोठी मदत झाली असून वाहतुकीला वळण लागत असल्याचे आढळून येत आहे.
नियोजनबद्ध पोलिसिंगमुळे गुन्हेगारीवर अंकुश
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या कार्यकाळात महापालिका व ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या. महानगर पालिकेची निवडणूक पोलिसांसाठी एक आव्हान असते. मात्र, नियोजनबध्द पूर्वतयारीने मंडलिक यांनी ते आव्हान लिलया पेलले. मागील दीड वर्षांत मोठ-मोठी आंदोलनेही झालीत. गणेशोत्सव, नवरात्रही कायदा व सुव्यवस्थेला गालबोट न लागता पार पाडलेत. या काळात पोलीस प्रमुख म्हणून मंडलिक गुन्हेगारावर अंकुश राखण्यात यशस्वी झाले. पोलीस आयुक्तांनी सातत्याने नाकाबंदी, पोलिसांची पायदळ गस्त, स्टंट राईडरवर कारवाई व स्वत:ही रस्त्यावर उतरून अंबानगरीतील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न केले.
सीपींचे आगामी नियोजन
आगामी नियोजनात सीपी शाळा-महाविद्यालये व शिकवणी वर्गावरील नियमबाह्य प्रकारावर लक्ष केंद्रित करणार आहेत. तेथे साध्या वेशात पोलीस तैनात केले जाईल.अचानक सीपीसुध्दा भेट देणार असल्याची माहिती आहे. खासगी शिकवणी वर्ग, कॅफे हाऊसवर चालणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांची छेडखानी, गुंड प्रवृतींना आळा बसविणे व शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गासमोरील अवैध पार्किंगविषयी आता कारवाई केली जाणार आहे.

Web Title: 'CP in Action' for poor transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.