बीअर बारची परवानगी देण्यास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:35 PM2018-10-17T21:35:44+5:302018-10-17T21:36:03+5:30

स्थानिक हर्षराज ते नवसारी मार्गावरील व अरुणोदय इंग्लिश स्कूललगत असलेल्या हॉटेलला बीअर बारची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी या परिसरातील नागरिकांसह आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Citizens' opposition to allow beer bar | बीअर बारची परवानगी देण्यास नागरिकांचा विरोध

बीअर बारची परवानगी देण्यास नागरिकांचा विरोध

Next
ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : नवसारी परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक हर्षराज ते नवसारी मार्गावरील व अरुणोदय इंग्लिश स्कूललगत असलेल्या हॉटेलला बीअर बारची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी या परिसरातील नागरिकांसह आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
हर्षराज ते नवसारी मुख्य मार्गावर असलेल्या एका हॉटेलला बीअर बारची परवानगी मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अरुणोदय शाळेच्या प्रवेशद्वाराला लागून हे हॉटेल आहे. बीअर बार परवान्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता असून, रहदारीच्या वस्तीत बार झाल्यास नागरिकांनासुद्धा मद्यपीचा त्रास होऊ शकतो. यामुळे दारूबंदी विधेयक अधिनियमानुसार ७५ मीटरच्या वर शाळा आणि कॉलेजच्या प्रवेशद्वाराचे अंतर असणे गरजेचे असून, सद्यस्थितीत कॉलेजचे प्रवेशद्वार जवळपास ५० मीटर अंतरावरच आहे. त्यालगतच लोकवस्ती आहे. त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करुन बीअर बारचा परवाना देऊ नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे केली.
दरम्यान, यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी नागरिक व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी विशाखा नाफडे, सीमा कुथे, नीता काळमेघ, संध्या किचंबरे, शिल्पा पाजनकर, वसंत लुंगे, नगरसेविका नीलिमा काळे, स्वाती जावरे, मंजुश्री महल्ले, प्रदीप बाजड, सुनील जावरे, प्रशांत महल्ले, मुकुंद माहोरे, गजानन व्यवहारे, अभय पिहूलकर, विनोद वासनिक, सतीश घारड, मनीष उमेकर, योगेश पेढेंकर, सुरेश कश्यप, विशाल महल्ले यांच्यासह परिसरातील नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Citizens' opposition to allow beer bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.