पुलावरून कोसळली शिक्षकाची कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:43 AM2019-04-27T00:43:13+5:302019-04-27T00:44:08+5:30

भरधाव कार पुलावरून कोसळून जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बहिरमनजीक सायखेड येथे घडली. ते चिखलदरा तालुक्यातील कोटमी ेयेथील शाळेत कार्यरत आहेत.

The car of the train collapsed from the bridge | पुलावरून कोसळली शिक्षकाची कार

पुलावरून कोसळली शिक्षकाची कार

Next
ठळक मुद्देपोलिसांत नोंद नाही : बहिरमनजीक तीन जखमी

परतवाडा : भरधाव कार पुलावरून कोसळून जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बहिरमनजीक सायखेड येथे घडली. ते चिखलदरा तालुक्यातील कोटमी ेयेथील शाळेत कार्यरत आहेत.
दिनेश देशमुख (५१, रा अमरावती), राखी कडू (५०, रा. चांदूर बाजार) व मीनाक्षी मुंदाने (३८, रा. अमरावती) अशी शिक्षकांची नावे आहेत. चालक मनोज डवंगे हासुद्धा किरकोळ जखमी झाला. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
शाळा सकाळच्या सत्रात असल्याने लगबगीत हे सर्व शिक्षक कारने जात होते. पुलावर डुक्कर आडवे आल्याने हा किरकोळ अपघात झाला. मात्र, त्याची शिरजगाव पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात आहे.

Web Title: The car of the train collapsed from the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात