ऊर्ध्व वर्धाच्या कालव्यात दोघे गेले वाहून; तिवसा, मोर्शी येथील उजव्या कालव्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 07:09 PM2018-01-22T19:09:59+5:302018-01-22T19:10:21+5:30

Both of them were carried on the canal of the upper part of Wardha; Tavasa, the right canal incident in Morshi | ऊर्ध्व वर्धाच्या कालव्यात दोघे गेले वाहून; तिवसा, मोर्शी येथील उजव्या कालव्यातील घटना 

ऊर्ध्व वर्धाच्या कालव्यात दोघे गेले वाहून; तिवसा, मोर्शी येथील उजव्या कालव्यातील घटना 

googlenewsNext

तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. 
प्राप्त माहितीनुसार, तिवसा तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील शेंदूरजना बाजार येथील शेतकरी गणेश आसोडे यांच्या शेतातून त्यांचा मुलगा नीलेश हा भाजीपाला आणत होता. भाजीपाला धुण्यासाठी तो कालव्यात उतरला. त्याच्या मागेच वडील उभे होते. दरम्यान, पाय घसरून पडल्याने तो बारा फूट खोल कालव्यात पडला. त्याला वाचविण्याचे वडिलांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. पोहता येत नसल्याने व कालव्याचे पाणी वाहते असल्याने तो तग धरू शकला नाही व यातच त्याचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर नीलेशचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू होती. वडिलांदेखत तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
दुसरी घटना मोर्शी तालुक्यात रविवारी घडली. येथील गिट्टी खदान परिसरात राहणारा राजू विठ्ठल बोरावार धरणातून निघणाºया कालव्यातून मासेमारी करून परत येत असताना शौचास गेला. कालव्यात उतरत असताना त्याचा पाय घसरल्याने तो वेगवान प्रवाहात सापडला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याचा मृतहेद घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर सापडला. ज्या ठिकाणी तो बुडाला, ते ठिकाण धरणापासून केवळ ५० फूट अंतरावर आहे. येथे कालव्याची खोली अंदाजे १५ फूट आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास मोर्शीचे ठाणेदार राजेश राठोेड करीत आहेत. उजवा कालवा मोर्शी, तिवसा धामणगाव व वर्धा जिल्ह्यातील पुलगावपासून पुढे जातो.

Web Title: Both of them were carried on the canal of the upper part of Wardha; Tavasa, the right canal incident in Morshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.